पाकिस्तानचा कुख्यात दहशतवादी आणि लष्कर ए तैयबाचा संस्थापक हाफिज सईद तसेच हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन, काश्मीरचा विभाजनवादी नेता यासिन मलिक, शब्बीर शहा, मसरत आलम, काश्मीरचा राजकीय नेता रशिद इंजिनीयर, व्यावसायिक झहूर अहमद शहा, बिट्टा कराटे, आफताब अहमद शहा, अवतार अहमद शहा, नईम खान, बशीर अहमद भट आणि इतरांवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोप निश्चित करण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयाने आदेश दिले आहेत. यूएपीए या कायद्याअंतर्गत गुन्हेगारी स्वरूपाचे कारस्थान, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, बेकायदेशीर कृत्ये असे आरोप त्यांच्यावर आहेत.
न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानकडून यासाठी टेरर फंडिंग होत होते. त्याशिवाय हाफिज सईदच्या माध्यमातूनही हे टेरर फंडिंग केले जात होते.
हे ही वाचा:
जपान भारतात करणार पुढील पाच वर्षांत ३.२० लाख कोटींची गुंतवणूक
अमित शाहांनी घेतला जम्मू काश्मीर मधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा
‘द काश्मीर फाइल्स’ ने मोडला दंगल विक्रम, बाहुबली-२ चा विक्रम मोडण्याच्या मार्गावर
जगात भारी; नरेंद्र भाई! पंतप्रधान मोदी अव्वल
एनआयएचे विशेष न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी हे आदेश १६ मार्चला दिले आहेत. साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारे हे स्पष्ट होते की, या सर्वांचे एकमेकांशी संबंध होते. या सगळ्यांचे दहशतवादी संघटनांशी निकटचा संबंध होता, त्यांचे उद्दीष्ट एकच होते आणि त्यांना पाकिस्तानकडून टेरर फंडिंग केले जात होते.
सध्या देशभरात द काश्मीर फाइल्स हा चित्रपट गाजत आहे. या चित्रपटात काश्मीरमधील इस्लामी दहशतवादावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्याच दरम्यान या गुन्हेगारांवर आरोप निश्चित करण्याचे आदेश एनआयएने दिल्यामुळे यासिन मलिक, बिट्टी कराटेसारख्या दहशतवाद्यांवर आगामी काळात कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. हे दोघेही सध्या तुरुंगवासात आहेत.







