29.6 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरविशेषदिल्लीत इमारतीला भीषण आग; २७ जणांचा मृत्यू

दिल्लीत इमारतीला भीषण आग; २७ जणांचा मृत्यू

Google News Follow

राजधानी दिल्लीत शुक्रवार, १३ मे रोजी एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळील इमारतीला लागलेल्या आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एका ऑफिसमध्ये आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

मुंडका मेट्रो स्टेशनजवळील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे बनवणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाला संध्याकाळी ४.४० वाजता आग लागली. अग्निशमन दलाच्या २४ गाड्यांनी अथक प्रयत्नांनंतर मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आणली. दरम्यान या दुर्घटनेत २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आगीतून ५० ते ६० जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

हे ही वाचा:

यूएईचे अध्यक्ष शेख खलिफांचे निधन

मलिकांना जामीन नाहीच; पण खासगी रुग्णालयात उपचारांची परवानगी

‘सत्तेसाठी ठाकरे सरकारने हिंदुत्व गहाण ठेवले’

कराची बाजारपेठेत स्फोट; तीन ठार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. “दिल्लीतील भीषण आगीत झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दुःख झालं आहे. शोकाकुल कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे,” असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे. केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची तर जखमींसाठी ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा