29.3 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरविशेषविराट कोहली तिसऱ्या कसोटीच्या बाहेर?

विराट कोहली तिसऱ्या कसोटीच्या बाहेर?

Google News Follow

टीम इंडियाने चेन्नईतील दुसऱ्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध ३१७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. दुसरी कसोटी जिंकत चार सामन्यांच्या मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी केली आहे. या मालिकेचा तिसरा सामना २४ फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. परंतु तिसर्‍या कसोटीपूर्वी टीम इंडिया मोठ्या अडचणीत आल्याचे दिसत आहे. तिसऱ्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीला बंदीचा धोका आहे. त्यामुळे विराट तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे.

हे ही वाचा:

भारताच्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंड; मालिकेत १-१ अशी बरोबरी

कर्णधार विराट कोहलीने तिसर्‍या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी पंच नितीन मेनन यांच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. कर्णधार विराट कोहली पंचांशी बराच वेळ निर्णयावरुन वाद घालत होता. जो रूटला आऊट न दिल्यामुळे कर्णधार विराट कोहली खूप चिडला होता.

२०१९ च्या अखेरीस विराट कोहलीला आधीपासूनच दोन डिमेरिट गुण मिळाले आहेत. पंचांच्या चेन्नईत झालेल्या निर्णयावर नाराजीमुळे विराट कोहलीला दोन किंवा त्याहून अधिक डिमेरिट गुण मिळाले तर त्याच्यावर एका कसोटीसाठी बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विराट कोहलीला अहमदाबाद कसोटीतून बाहेर पडावे लागू शकते.

विराट कोहली आतापर्यंत या मालिकेत फॉर्ममध्ये आहे. विराट कोहलीने अत्यंत कठीण परिस्थितीत मालिकेच्या दोन्ही सामन्यात अर्धशतक ठोकली आहेत. विराट कोहलीवर बंदी घातली गेली तर सध्या संघाचा उपकर्णधार असलेला अजिंक्य रहाणे संघाचा कर्णधार होईल.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा