22 C
Mumbai
Sunday, December 21, 2025
घरधर्म संस्कृतीपालघरमध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी घरात घुसून केला धर्मांतरणाचा प्रयत्न

पालघरमध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी घरात घुसून केला धर्मांतरणाचा प्रयत्न

Google News Follow

Related

देशात अनेक ठिकाणी धर्मांतरणाच्या घटना आढळत असतात. विशेषतः आदिवासी, वनवासी समाजातील लोकांना धर्माच्या जाळ्यात ओढून त्यांना पैशाचे, नोकरीचे आमिष दाखवून धर्मांतरित केले जाते. असाच प्रकार महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात घडला आहे. डहाणू तालुक्यात पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करणाऱ्या ख्रिस्ती मिशनऱ्यांविरोधात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. या चार जणांनी घरात घुसून गरीब कुटुंबाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पण एवढा गंभीर गुन्हा असतानाही त्यांच्यावर जामिनपात्र कलमे लावण्यात आल्याबद्दल स्थानिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. १५३ ऐवजी १५३ अ हे कलम लावले गेले पाहिजे होते, अशी स्थानिकांची मागणी आहे.

हे प्रकरण नेमके कसे झाले हे या एफआयआरमध्ये नोंदविण्यात आले आहे.

येसू वसंत धोडी या ५० वर्षे वयाच्या आदिवासी महिला सरावली येथे राहतात. त्यांची चार मुलेही सोबत असतात. दीपक, चंदू, विजय व अजय अशी त्यांची नावे आहेत. अजय हा बोईसर येथे नोकरी करतो. त्याच्यावर घराचा उदरनिर्वाह चालतो. ५ ऑगस्टला त्यांच्या घरी दोन महिला व चार पुरुष आले. त्यांनी घरात येऊ का विचारणा केली. तेव्हा येसू यांनी त्यांना कारण विचारल्यावर ते काहीएक न बोलता घरात येऊन बसले. त्यातील एका पुरुषाने आमचा ख्रिश्चन धर्म स्वीकाराल का, असा सवाल केला.

हे ही वाचा:

अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या घड्याळाची ११ लाख डॉलरला विक्री

बॉलीवूड चित्रपटांवर बहिष्कार घालण्याचे तो वाहनचालक का करतोय आवाहन?

औरंगजेब चांगला; मग शिवाजी महाराज वाईट होते की काय ?

“पाकिस्तानी खेळाडू पदकं जिंकत आहेत हे नेत्यांना माहित आहे का?” पाक पत्रकाराचा सवाल

 

तुम्ही धर्म स्वीकारलात तर तुमचे सगळे दुखणे बंद होईल, असे तो म्हणाला. त्याने काही पैसेही देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा येसू यांनी पैसे नाकारले. पण त्या पुरुषाने सांगितले की, तुम्ही तुमच्या धर्माचे पालन करू नका, त्याने काहीही होणार नाही. तुम्ही ख्रिश्चन धर्माचे पालन करा. सगळी दुःखे दूर होतील. तोपर्यंत घरात शेजारची लोक जमू लागली. या घरात आलेल्या पुरुषांबद्दल त्यांना कळल्यावर पोलिसांना बोलावण्यात आले. त्या व्यक्तींची नावे क्लेमेंट बैला, मरिअमा फिलिप्स, परमजीत उर्फ पिंकी शर्मा कौर, परशुराम शिंगाडा अशी आहेत. त्यांनी जबरदस्तीने घरात प्रवेश करून धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला.

पोलिस यासंदर्भात तपास करत आहेत. घरात धर्मांतरणासाठी शिरलेल्या या लोकांशी स्थानिकांचा वादही झाला. तुम्ही अशाप्रकारे धर्मांतरण करण्यासाठी गैरमार्ग कसा काय अवलंबता असे म्हणत स्थानिकांनी त्यांना विचारणा केली. पोलिस यासंदर्भात तपास करत आहेत. पण धर्मांतरण करण्यासाठी आलेल्या मिशनऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.  राष्ट्रीय हिन्दू सेवा संघ और विहिप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी यासंदर्भात कठोर भूमिका घेतली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा