27.9 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरधर्म संस्कृती'आदिपुरूष' सिनेमाच्या टीझर रिलीजसाठी प्रभास, क्रिती पोहचले अयोध्येत

‘आदिपुरूष’ सिनेमाच्या टीझर रिलीजसाठी प्रभास, क्रिती पोहचले अयोध्येत

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन हे रविवार, २ ऑक्टोबर रोजी श्रीराम जन्मभूमी असलेल्या पवित्र अशा अयोध्या नगरीत पोहचले होते.

Google News Follow

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन हे रविवार, २ ऑक्टोबर रोजी श्रीराम जन्मभूमी असलेल्या पवित्र अशा अयोध्या नगरीत पोहचले होते. आपल्या आगामी चित्रपट ‘आदिपुरूष’ सिनेमाच्या टीझर रिलीजसाठी प्रभास आणि क्रिती अयोध्या येथे गेले होते.

सिनेमाच्या टीजर रिलीजसाठी काल प्रभास आणि क्रिती अयोध्येत पोहचले होते. यावेळी त्यांनी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. तसेच यावेळी दोघांचेही चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभूंचे दर्शन घेतल्यानंतर ते कार्यक्रमस्थळी रवाना झाले.

प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन या स्टार कलाकारांची. भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे कथानक रामायणातून प्रेरित आहे. या चित्रपटात प्रभास प्रभू राम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सैफ अली खान रावणाचे पात्र साकारणार आहे तर क्रिती सीतेच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट तेलुगूसह हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

हे ही वाचा:

भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल ‘या’ १० खास गोष्टी माहित आहेत का?

नवरात्री २०२२ : हिंगलाज माता पाकिस्तानातील एकमेव शक्तीपीठ

विमानतळावर ‘श्रीराम’ दिसले आणि…

इम्रान खान यांना अटक होणार?

‘आदिपुरुष’ हा सिनेमा १२ जानेवारी २०२३ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी जवळपास ५०० कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिगदर्शन ओम राउत यांनी केलं आहे. तर प्रभास साकारत असलेल्या श्रीरामांच्या पात्राला डबिंगमध्ये मराठी अभिनेते शरद केळकर हे आवाज देणार आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा