28 C
Mumbai
Wednesday, December 24, 2025
घरविशेषकोरोनानंतर दोन वर्षांनी पुन्हा ‘बिपिन’साठी मैदाने फुलणार

कोरोनानंतर दोन वर्षांनी पुन्हा ‘बिपिन’साठी मैदाने फुलणार

Google News Follow

Related

गेली अनेक वर्षे फुटबॉल शिबिरे आणि स्पर्धेच्या माध्यमातून या खेळाला वाव देणाऱ्या बिपिन फुटबॉल अकादमीच्या वतीने ३४वे बिपिन फुटबॉल अकादमी मोफत शिबीर आयोजित करण्यात आले आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे हे शिबीर होऊ शकले नव्हते. मात्र आता पुन्हा एकदा मैदाने छोट्या फुटबॉलपटूंनी भरणार आहेत. त्यानंतर दोन दिवसांची राऊंड रॉबिन लीग पद्धतीने खेळविली जाणारी स्पर्धाही होणार आहे. १६ वर्षांखालील मुलामुलींसाठीचे हे शिबीर १७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

बिपिन फुटबॉलचे निमंत्रक सुरेंद्र करकेरा यांनी ही माहिती दिली. या शिबिराचा उद्घाटन सोहळा १६ ऑक्टोबरला होत आहे. बोरिवली येथील एमसीएफ जॉगर्स मैदानावर हे उद्घाटन होईल. या शिबिरानंतर त्यात सहभागी झालेल्या विविध केंद्रांच्या लढती आणि अंतिम सामना ३१ डिसेंबर २०२२ आणि १ जानेवारी २०२३ रोजी होतील.

हे ही वाचा:

अपंग तरुणाने केले २ वर्षाच्या मुलीचे अपहरण

भारत करणार चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व

भुजबळांप्रमाणे चतुर्वेदी सीए याने ‘मातोश्री’ची कागदपत्रे व्हाईट करून घेतली

ध्वनीप्रदूषणात ठाकरे गटाचा मोठा आवाज; किशोरी पेडणेकरांचे भाषण कानठळ्या बसवणारे

 

जी आठ केंद्रे शिबिरासाठी करण्यात आली आहेत ती बोरिवली, वसई-विरार, कल्याण, कुर्ला, उल्हासनगर, कुलाबा, अंधेरी आणि मदनपुरा अशी आहेत. जानेवारी १ २००७ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलांना या शिबिरात प्रवेश मिळेल. आवश्यक ती कागदपत्रे दाखवून मुलांनी प्रवेश घ्यावा.

या शिबिरांची सविस्तर माहिती अशी

बोरिवली : शिबीर संचालक : कमलेश शृंगी (९८१९४७२४४०), प्रशिक्षक : फ्रान्सिस न्यून्स, स्थळ : एमसीएफ जॉगर्स पार्क फुटबॉल ग्राऊंड.

मदनपुरा : संचालक : नासिर अन्सारी (९८९२८८२९६६), प्रशिक्षक : मोहम्मद युसूफ अन्सारी, स्थळ : वायएमसीए ग्राऊंड, मुंबई सेंट्रल.

कुलाबा : संचालक : सुधाकर राणे (७६६६९६३०३५), प्रशिक्षक : सचिन नरसप्पा, स्थळ : कुलाबा बॅकबे ग्राऊंड

अंधेरी : संचालक : सिद्धार्थ साबापट्टी (७७३८४५०४३१), प्रशिक्षक : रणजित मटकर, स्थळ : अंधेरीचा राजा ग्राऊंड, आझाद नगर.

वसई विरार : संचालक : रुडॉल्फ डीकुन्हा (७३८५४८२२९९), प्रशिक्षक : मार्टिन असीसी, स्थळ : सेंट झेवियर्स ग्राऊंड, सेंट मायकेल चर्चच्या समोर, माणिकपूर, वसई (प.)

कल्याण : संचालक : थॉमस कॅटेलिनो (७४०००९४२४८), प्रशिक्षक : थॉमस नाडर, स्थळ : मॅक्सी फुटबॉल ग्राऊंड

कुर्ला : संचालक : सलीम खान (९००४८१०१७७), प्रशिक्षक : आदिल अन्सारी, स्थळ : काका बाप्तिस्ता ग्राऊंड, कलिना, सांताक्रूझ

उल्हासनगर : संचालक : श्याम खरात (८०८०९०६२६२), प्रशिक्षक : मोनप्पा मुल्या. स्थळ : बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल ग्राऊंड.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा