26 C
Mumbai
Wednesday, December 17, 2025
घरधर्म संस्कृतीइंटरनॅशनल हलाल शो इंडियाच्या विरोधात आवाज बुलंद

इंटरनॅशनल हलाल शो इंडियाच्या विरोधात आवाज बुलंद

कार्यक्रम रद्द करण्याची कृती समितीची मागणी

Google News Follow

Related

हलाल प्रमाणपत्रे आणि दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवल्याचा आरोप असलेल्या हलाल उत्पादनांच्या विक्रीचे पुरावे समोर आल्यानंतर मुंबईतील प्रस्तावित ‘इंटरनॅशनल हलाल शो इंडिया’ला राष्ट्रवादी नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. मुंबईतील मरीन लाइन्स येथील इस्लामिक जिमखाना येथे १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी होणारा हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटना आणि तमाम देशभक्त नागरिकांनी केली आहे. या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी ‘हलाल विरोधी कृती समिती’ स्थापन करण्यात आली आहे. वेळ येईल तेव्हा त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि हलाल शोचा निषेध करतील असे समितीने म्हटलं आहे.

गेल्या काही काळापासून भारतात ‘हलाल’ उत्पादनांना मागणी होत असून, व्यवसाय करण्यासाठी ‘जमात ए-उलेमा-ए-हिंद’ सारख्या संघटनांकडून ‘हलाल प्रमाणपत्र’ घेण्याचा हिंदू व्यापाऱ्यांवर सक्ती करण्यात येत असल्याचा आरोप समितीने केला आहे. हलाल उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ब्लॉसम इंडिया’ संस्थेने ‘इंटरनॅशनल हलाल शो इंडिया’चे आयोजन केले आहे. दादर, घाटकोपर आणि धारावीमध्ये समितीने बैठक घेऊन पोलिस आयुक्तांना निवेदन दिले आहे. यासोबतच समितीने प्रस्तावित शोला तीव्र विरोध करण्याची घोषणा केली आहे.

हे ही वाचा:

‘अजित पवारांची कुणालाही गॅरेंटी नाही’

‘मराठी मुस्लिम संकल्पनेचा प्रचार करणारे तोतया’

एका लग्नाची पुढची गोष्टचा १२,५०० वा प्रयोग, राज-फडणवीस उपस्थित राहणार

दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांना राष्ट्रवादीकडून ती मदत अद्याप नाही, पत्नीने केली विनंती

कल्याण (पु.) कृती समितीने हलालचा कडकडीत निषेध करत ‘आंतरराष्ट्रीय हलाल शो’ रद्द करण्याची मागणी केली. यावेळी आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी हातात घोषणा देणारे फलक घेतले होते. शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनावर त्यांनी लोकांच्या सह्याही घेतल्या. त्यांचे म्हणणे आहे की भारत सरकारच्या ‘एफएसएसएआय’ आणि ‘एफडीए’ या अधिकृत संस्था उत्पादने प्रमाणित करत आहेत, मग वेगळ्या ‘हलाल प्रमाणपत्र’ची काय गरज आहे? भारतातील १५ टक्के मुस्लिम समाजासाठी ८० टक्के हिंदू समुदायावर हलाल उत्पादनांची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही, असेही कृती समितीने म्हटलं आहे आहे.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा