30.4 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरविशेषफिजियोथेरेपीस्ट नव्हे हा तर रेपिस्ट

फिजियोथेरेपीस्ट नव्हे हा तर रेपिस्ट

आरोपी रिंकूवर अल्पयीन मुलीवर बलात्काराप्रकरणी तिहार जेलमध्ये आहे.

Google News Follow

आम आदमी पार्टी दिवसेंदिवस आपल्याच जाळ्यात अडकत चालली आहे. आपचे सत्येंद्र जैन सध्या तुरुंगात असून, त्यांना तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची माहिती समोर आली होती. सत्येंद्र जैन यांचा तुरुंगातील मसाज करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जैन आजारपणामुळे फिजिओथेरपी घेत असल्याचे सिसोदिया म्हणाले आहेत. परंतु हा फिजिओथेरपिस्ट नसून रेपिस्ट आहे, अशी माहिती आहे. यामुळे आता या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.

जैन यांची फिजिओथेरपी करणारी व्यक्ती फिजिओथेरपिस्ट नसून रेपिस्ट असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचे नाव रिंकू आहे. रिंकू अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगाची शिक्षा भोगत आहे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात जेलमध्ये असलेल्या या व्यक्तीकडून जैन मसाज करून आपली सेवा करतानाचा व्हिडिओ सध्या खूप गाजतोय. एएनआय वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, जो व्यक्ती तुरुंगात जैन यांचा मसाज करत आहे. तो एक कैदी आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मसाज करणारी ही व्यक्ती फिजिओथेरपिस्ट नसून बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. पॉस्को कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा आहे.

विशेष म्हणजे शनिवारी जैन यांचा मसाज करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. सत्येंद्र जैन यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग सारखा गंभीर गुन्हा असूनही त्यांना सर्व सुखसुविधा कशा काय मिळत आहेत. जैन पलंगावर झोपून मसाजचा आनंद लुटत आहेत. पिण्यासाठी मिनरल वॉटर, वाचण्यासाठी वृत्तपत्रे. झोपायला आरामदायी पलंग आणि उशा आहेत. आरामदायी बेडवर झोपून मनोरंजनासाठी टीव्ही अशी व्हिआयपी ट्रीटमेंट त्यांना मिळत आहेत, हे या व्हिडिओवरून स्पष्ट होतेय.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा