36 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
घरविशेषउमेश पाल हत्या प्रकरणातून अतीक अहमदची पाच मुलं आणि पत्नीवर बक्षिस

उमेश पाल हत्या प्रकरणातून अतीक अहमदची पाच मुलं आणि पत्नीवर बक्षिस

पत्नी शाइस्ता परवीनवरही २५ हजार रुपयांचे बक्षीस

Google News Follow

Related

प्रयागराजमधील बहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार उमेश पाल यांची गोळ्या झाडून मध्यंतरी हत्या करण्यात आली. धूमनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमेश पाल यांच्यावर हल्लेखोरांनी त्यांच्या घराबाहेर बॉम्ब आणि गोळ्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याने १८ वर्षांपूर्वीच्या घटनेची आठवण करून दिली, जेव्हा बसपचे आमदार राजू पाल यांची हत्या झाली होती. या प्रकरणात अतीक अहमद वर खटला सुरू होता. राजू पाल हत्येचा साक्षीदार उमेश पाल हा होता. उमेश पाल यांच्या खूनाप्रकरणी अतिक अहमदचा भाऊ संशयात भोवऱ्यात सापडला. उमेश पाल यांची पत्नी जया पाल यांनी माफिया अतिक अहमद त्याची पत्नी शाइस्ता आणि भावासह दोन मुलांविरूद्ध गुन्हा दाखल केला.

गुन्हेगार ते आमदार आणि आमदार ते खासदार अतीक अहमद यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अतीकची पत्नी शाइस्ता परवीनवरही २५ हजार रुपयांचे बक्षीस लावले आहे. पोलिस तिचा शोध घेत आहेत. कासारी मसारी येथे राहणाऱ्या शाइस्ता हिच्याशी अतीक अहमद यांचा विवाह २ ऑगस्ट १९९६ रोजी झाला होता. अतीक आणि शाइस्ता यांना पाच मुले आहेत.

अतीकच्या पाच मुलांमध्ये ओमर, अली, असद, अहजाम आणि अबान यांचा समावेश आहे. अतीक अहमद हे पाच वेळा आमदार आणि एक वेळा खासदार राहिले आहेत. १९८९, १९९१, १९९३, १९९६ आणि २००२ मध्ये ते शहर पश्चिम मतदारसंघातून सलग आमदार म्हणून निवडून आले. २००४ मध्ये ते फुलपूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत.

याआधीही अतीक तुरुंगात बंद होता. जामिनानंतर तो बाहेरही आला. पण २०१९ पासून अतीक अहमद सातत्याने तुरुंगात आहे. सध्या तो गुजरातच्या साबरमती तुरुंगात आहे. अतीक अहमद जेव्हा पहिल्यांदा तुरुंगात गेले, त्याच वेळी त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली होती. त्यानंतर त्यांचे पुत्र ओमर यांनी निवडणुकीची धुरा सांभाळली आणि अतीक अहमद यांचा प्रचार केला होता.

एप्रिल २०१८ मध्ये बिल्डर मोहित अग्रवाल यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याचा आरोपही उमरवर होता. सीबीआयने त्यांच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते आणि त्याने ३१ जुलै रोजी न्यायालयात शरणागती पत्करली होती. सध्या तो लखनौ तुरुंगात आहे. अतीक अहमद यांचा प्रभाव थोडा कमी होऊ लागल्यावर अतीक यांच्या कुटुंबाने राजकारणात प्रवेश केला.

२०२१ मध्ये अतीक यांचे कुटुंब असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एमआयएममध्ये सामील झाले. त्यानंतर ओवेसींचा पक्ष अलीला तिकीट देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, त्याचवेळी ३१ डिसेंबर २०२१ रोजी अलीवर त्याच्या नातेवाईकाकडे ५ कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप झाला आणि तो पोलिसांपासून वाचण्यासाठी पळून गेला.

पोलिसांनी अलीवर ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आणि त्यानेही ३१ जुलै रोजी न्यायालयात शरणागती पत्करली. माफिया अतीक अहमद यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात तर येणार नाही, यासाठी अतीक अहमद यांच्या पत्नी शाइस्ता यांनी ५ जानेवारी २०२३ रोजी प्रयागराजमध्ये बसपामध्ये प्रवेश केला आणि बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली.

बसपा महापौरपदाचा उमेदवार बनेल, अशी आशा शाइस्ता यांना होती आणि निवडणूक प्रचारही सुरू झाला होता. बसपामध्ये प्रवेश केल्यानंतर शाइस्ता परवीन यांनीही एक भाषण केले, ज्यात त्या एका कार्यक्षम नेत्याप्रमाणे जनतेला संबोधित करत होत्या. शाइस्ता परवीन यांचे भाषण सर्वजण ऐकत होते.

हेही वाचा :

पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यामुळे रुग्ण, शाळांना फटका

पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यामुळे रुग्ण, शाळांना फटका

म्यानमारमध्ये बौद्ध भिक्षुंना घातल्या गोळ्या

शाइस्ता परवीन म्हणाल्या होत्या की, त्यांचे संपूर्ण कुटुंब नेहमीच बहनजींच्या पाठीशी आहे आणि त्यांना न्याय दिला जाईल असे त्यांनी म्हटले होते. पण याचदरम्यान २४ फेब्रुवारीला धूमनगंज भागात उमेश पाल यांची हत्या झाली. ज्यात अतीक अहमदच्या संपूर्ण कुटुंबाचं नाव होतं. आता अतीकची पत्नी शाइस्तावर २५ हजार रुपयांचे बक्षीस आहे.

तर तिसरा मुलगा असद याच्यावर अडीच लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असून, तोही फरार आहे. चौथा मुलगा अहजाम आणि पाचवा मुलगा अबान देखील बेपत्ता आहेत. चौथा मुलगा अहजाम आणि पाचवा मुलगा अबान देखील बेपत्ता आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा