28.4 C
Mumbai
Thursday, October 29, 2026
घरदेश दुनियाकरतारपूर साहिबला भेट देणाऱ्या यात्रेकरूंवर पाकिस्तानची शुल्क सक्ती

करतारपूर साहिबला भेट देणाऱ्या यात्रेकरूंवर पाकिस्तानची शुल्क सक्ती

भारताने विनंती करूनही पाकिस्तान प्रत्येक भेटीसाठी भारतातून यात्रेकरूंकडून शुल्क आकारत आहे.

Google News Follow

गुरुद्वारा दरबार साहिब करतारपूरला हजारो यात्रेकरू भेट देत असतात. या यात्रेकरूंवर शुल्क आकारण्यात येऊ नये अशी विनंती केंद्र सरकारने पाकिस्तानला केली होती. परंतु तरीही पाकिस्तान श्री करतारपूर साहिब कॉरिडॉरद्वारे गुरुद्वारा दरबार साहिब करतारपूरला भेट देणाऱ्या यात्रेकरूंवर शुल्क आकारत असल्याचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी म्हटले आहे.

जगभरातून पवित्र स्थळाला भेट देणाऱ्या शीख यात्रेकरूंसाठी करतारपूर साहिबला पासपोर्टमुक्त करण्याची सरकारची काही योजना आहे का? असा प्रश्न खासदार हरसिमरत कौर बादल यांनी राज्यसभेमध्ये विचारला होता. बादल यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना व्ही मुरलीधरन यांनी वरील उत्तर दिले आहे.

मुरलीधरन म्हणाले कि भारताने विनंती करूनही पाकिस्तान प्रत्येक भेटीसाठी भारतातून यात्रेकरूंकडून शुल्क आकारत आहे. श्री करतारपूर साहिब कॉरिडॉरद्वारे गुरुद्वारा दरबार साहिब करतारपूरला भेट देणाऱ्या यात्रेकरूंकडून यात्रेकरूंकडून कोणतेही शुल्क आकारू नये, अशी विनंती भारत सरकारने पाकिस्तान सरकारला सातत्याने केली आहे. पण पाकिस्तान प्रत्येक यात्रेकरूकडून प्रत्येक प्रवासासाठी २० डॉलर शुल्क आकारतो याकडे मुरलीधरन यांनी लक्ष वेधले.

हे ही वाचा:

परदेशातल्या खलिस्तान समर्थकांचे पासपोर्ट होऊ शकतात रद्द, नातेवाईकांवरही कारवाई

केरळच्या महिलेने राहुल गांधींसाठी सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव

मी महाराष्ट्राची मुलगी, आज माहेरी आल्यासारखे वाटते आहे!

ओमानमधील भर कार्यक्रमात झाकीर नाईकने हिंदू महिलेला केले धर्मांतरित

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मुरलीधरन म्हणाले की, श्री करतारपूर साहिब कॉरिडॉरद्वारे गुरुद्वारा दरबार साहिब करतारपूरला पासपोर्ट-मुक्त प्रवासासाठी निवेदने प्राप्त झाली आहेत. २४ ऑक्टोबर२०१९ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात स्वाक्षरी झालेल्या द्विपक्षीय करारानुसार यात्रेकरू वैध पासपोर्टवर प्रवास करू शकतात. यात्रेकरूंच्या प्रवासाची सोय करण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजना, पवित्र गुरुद्वारा दरबारापर्यंतच्या व्हिसा-मुक्त प्रवासावर यासंदर्भात मुरलीधरन यांनी माहिती दिली .

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा