31 C
Mumbai
Tuesday, December 23, 2025
घरविशेषचैत्र वारीमुळे पंढरपुरात होणार ४ ते ५ लाख भाविकांची मांदियाळी

चैत्र वारीमुळे पंढरपुरात होणार ४ ते ५ लाख भाविकांची मांदियाळी

प्रशासनाकडून सर्वप्रकारचे नियोजन

Google News Follow

Related

चैत्र शुद्ध एकादशी २ एप्रिल रोजी असून, चैत्री यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी परराज्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातून सुमारे ४ ते ५ लाख भाविक येतात. यात्रा कालावधीत भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.

चैत्री यात्रा कालावधीत स्वच्छतेसाठी मंदीर परिसर, संतपेठ, स्टेशन रोड, जुनी पेठ-गोविंद पुरा, नविपेठ-इसबावी, मनिषा नगर-इसबावी असे पंढरपूर शहराचे ६ विभाग केले असून, स्वच्छतेसाठी ११४८ स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये ३४८ कायम तर ८०० हंगामी कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

पालघरच्या समुद्रात सापडली बोट, पोलिसांनी केला पाठलाग आणि..

हिंसक घटनांमुळे अमित शहांची सभा रद्द; सासारामला होणार होते भाषण

सांगली सहकारी बँकेच्या संचालकपदी हेमंत शिंदे

भारत-इस्रायल देणार दहशतवादाविरुद्धच्या लढाईला नवी दिशा

भाविकांना स्वच्छ पिण्याचा पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी शहरातील सार्वजनिक बोरवेल, हातपंप आदी ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे .तसेच शहरासह ६५ एकर, वाळवंट, पत्राशेड, दर्शन रांग, नदी वाळवंट आदी ठिकाणी जंतनाशक फवारणीसह, मँलेथॉन पावडर, ब्लिचिंग पावडर वेळोवेळी टाकण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत डम्पिंग ट्रॉल्या, कॉम्पॅक्टर, कंटेनर, घंटागाडी, जेसीबी, टीपर आदी वाहनांच्या माध्यमातून दररोज सुमारे ५५ ते १०० टन कचरा गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा