31 C
Mumbai
Saturday, December 20, 2025
घरविशेषजलसंधारण योजनेत महाराष्ट्र सर्व राज्यांमध्ये अव्वल

जलसंधारण योजनेत महाराष्ट्र सर्व राज्यांमध्ये अव्वल

Google News Follow

Related

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या पहिल्या गणनेचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे या अहवालातील माहितीनुसार, जलसंवर्धन योजनांच्या बाबतीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर असल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक संख्येने तळी आणि इतर जलसाठे आढळले आहेत. देशातील विविध राज्यांमधील टाक्यांच्या संख्येचा विचार करता आंध्रप्रदेशात त्यांची संख्या सर्वात जास्त असल्याचे दिसून आले आहे तर देशातील सर्वाधिक तलाव तामिळनाडू राज्यात असल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे.

दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली तसेच लक्षद्वीप हे भाग वगळता देशातील इतर ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २०१७-१८ हे संदर्भ वर्ष म्हणून गृहीत धरुन जलाशयांची ही पहिली गणना करण्यात आली. या अहवालातील सर्वात महत्त्वाच्या अनेक मुद्द्यांपैकी एक मुख्य मुद्दा म्हणजे जल संवर्धन योजना विभागात महाराष्ट्र देशभरातील सर्व राज्यांमध्ये अव्वल ठरला आहे.

जलाशयांच्या या पहिल्या गणनेमध्ये, महाराष्ट्रातील एकूण ९७,०६२ जलाशयांची मोजणी करण्यात आली असून त्यापैकी ९९.३% म्हणजे ९६ हजार ३४३ जलाशय ग्रामीण भागात आहेत तर उर्वरित०.७% म्हणजे ७१९ जलाशय शहरी भागात आहेत. महाराष्ट्रातील एकूण जलाशयांपैकी ९९.७ % म्हणजे ९६, ७६७  जलाशय सार्वजनिक मालकी प्रकारचे तर उरलेल्या०.३% म्हणजे २९५ जलाशयांवर खासगी मालकी हक्क आहे.

हे ही वाचा:

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल कालवश

आयकर खात्याची नाशिकमध्ये धाड; सापडली ३,३३३ कोटींची बेहिशोबी मालमत्ता

गोळीबार करत हॉटेल व्यवसायिकाला पळवले, सात जण अटकेत

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवू

महाराष्ट्रातील एकंदर जलाशयांचा विचार करता त्यापैकी ९८ .९ % म्हणजे ९६,०३३ जलाशय “सध्या वापरात असलेले” आहेत तर उरलेले १.१% म्हणजे १,०२९ जलाशय सध्या वापर न होणारे आहेत. सध्या वापरात असलेल्या” जलाशयांपैकी बहुतांश जलाशयांतील पाणी भूजल पुनर्भरणासाठी वापरले जाते. त्याखालोखाल प्रमाणात घरगुती वापरासाठी/ पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाण्याचा वापर होतो. देशातील जलाशयांच्या पाण्याचा विविध प्रकारांनी अधिकाधिक वापर करणाऱ्या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, जालना आणि नाशिक या तीन जिल्ह्यांचा समावेश असल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे.

राज्यात ५७४ नैसर्गिक जलाशय
महाराष्ट्रात ५७४ नैसर्गिक आणि ९६,४८८ मानव-निर्मित जलाशय आहेत. या ५७४ नैसर्गिक जलाशयांपैकी९८.४% म्हणजेच ५६५ जलाशय ग्रामीण भागात तर उर्वरित १.६% म्हणजेच ९ जलाशय शहरी भागात आहेत. तसेच, ९६,४८८ मानव-निर्मित जलाशयांपैकी ९९.३ % म्हणजेच ९५,७८८ जलाशय ग्रामीण भागात तर उर्वरित ०.७% म्हणजेच ७१० जलाशय शहरी भागात आहेत. बहुतांश मानव निर्मित जलाशयांच्या उभारणीचा मूळ खर्च ५ ते १०लाखांच्या दरम्यान आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा