28 C
Mumbai
Friday, November 1, 2024
घरविशेषठाण्यात गर्डर लाँचर कोसळून १७ जणांचा मृत्यू

ठाण्यात गर्डर लाँचर कोसळून १७ जणांचा मृत्यू

समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले गर्डर लाँचर मशिन कोसळले

Google News Follow

Related

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी ठाण्यात मोठी दुर्घटना घडली. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले गर्डर लाँचर मशिन कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवार, १ ऑगस्ट रोजी पहाटे घडला. ठाण्यातील सरलांबे गावाजवळ पुलाचे बांधकाम सुरू असताना हा अपघात झाला. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब १०० फूट उंचीवरून खाली मजूरांवर कोसळली. आतापर्यंत १५ मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. पोलिस कर्मचारी, एनडीआरएफचे जवान आणि अग्निशमन अधिकारी बचाव आणि मदतकार्यात गुंतले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:

…तरीही ब्रृजभूषण शरण सिंह कुस्ती महासंघ ताब्यात ठेवण्याच्या तयारीत

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांसमोर अजूनही शिल्लक १९९९चे प्रकरण

नोकरी जमीन घोटाळा प्रकरणात लालूंची ६ कोटींची मालमत्ता जप्त !

वनडे वर्ल्डकपची भारत-पाकिस्तान झुंज १४ ऑक्टोबरला 

हायवे आणि हाय-स्पीड रेल्वे ब्रिज बांधकाम प्रकल्पांमध्ये ‘प्रीकास्ट बॉक्स गर्डर’ बसवण्यासाठी या मशिनचा वापर केला जातो. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा मुंबई आणि नागपूरला जोडणारा ७०१ किमी लांबीचा द्रुतगती मार्ग आहे.

या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले असून मृत कामगारांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणाही त्यांनी केली आहे. तसेच जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा