28.1 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरराजकारणपोटदुखीमुळे शरद पवार रुग्णालयात

पोटदुखीमुळे शरद पवार रुग्णालयात

Google News Follow

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आलं असून त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली. पवारांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं. त्यामुळे पवार यांना ३१ मार्चला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. शरद पवारांवर एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. शरद पवारांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

दरम्यान, पवार हे गेल्या आठवड्यात संसदेच्या कामकाजात भाग घेण्यासाठी दिल्लीत होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप केले होते. त्यामुळे पवारांनी दिल्लीतील निवासस्थानी दोनदा पत्रकार परिषदा घेऊन देशमुखांचा बचावही केला होता. दरम्यान, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

हे ही वाचा:

बांग्लादेशमध्ये पुन्हा हिंदूंवर अत्याचार

कथित शाह-पवार भेटीने महाविकास आघाडीत खळबळ

ठाकरे सरकारच्या हिंदू विरोधी फतव्याला केराची टोपली दाखवत राज्यात होळीचा उत्साह

मिठी नदीतून सापडले सचिन वाझेच्या पापाचे पुरावे

खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करून पवारांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. बाबांना पित्ताशयाचा त्रास उद्भवला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ३१ मार्च रोजी त्यांना दहा दिवसांसाठी रुग्णालयात ऍडमिट करण्यात येणार आहे. त्यानंतर ते घरी आराम करतील. त्यामुळे त्यांचे सर्व कार्यक्रम आणि दौरे दोन आठवड्यांसाठी रद्द करण्यात आले आहेत, असं सुप्रिया यांनी म्हटलं आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा