27 C
Mumbai
Sunday, December 14, 2025
घरविशेषचीनचा ड्रॅगन खाली घसरतोय!

चीनचा ड्रॅगन खाली घसरतोय!

आयात, निर्यातीत सुरू झाली मोठी घट

Google News Follow

Related

पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या बिकट आहे. पाकिस्तानचा मोठा भाऊ म्हणून चीन वेळो-वेळी पाकिस्तानच्या पाठीशी उभा असतो. मात्र, पाकिस्तानला त्याच्या आर्थिक स्थितीतून वाचवण्याची जबाबदारी उचलणाऱ्या चीनची परिस्थिती इतकी बिकट आहे की चीनची अर्थव्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरू शकते.

 

 

चीनची निर्यात आणि आयातची अलीकडील आकडेवारी पाहिली असता दोन्हीमध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते. एक वर्षापूर्वीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेत मोठी घसरण झाली आहे.जगभरातील जागतिक मागणी कमी झाल्यामुळे चिनच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढत आहे. सीमाशुल्क विभागाकडून गुरुवारी प्रसारित केलेल्या माहितीवरून दिसून आले की, चिनची निर्यात ऑगस्टमध्ये ८.८ टक्क्यांनी घसरून रुपये २८४.८७ अब्ज झाली आहे. सलग चौथ्या महिन्यात ही घसरण झाली आहे. तर आयात ७.३ टक्क्यांनी घसरून रुपये २१६.५१ अब्ज झाली आहे.चिनच्या एकूण व्यापारची जुलैमधील आकडेवारी पाहता ८०.६ अब्ज डॉलरवरून रुपये ६८.36 बिलीयनवर घसरला आहे.

 

हे ही वाचा:

नव्या तंत्रज्ञानासह जपानचे चांद्रयान अवकाशात झेपावले

स्माईल प्लीज! आदित्य एल- १ ने पाठवला पहिला सेल्फी

‘भारत’मुळे I.N.D.I.A.ला फुटला घाम

ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर बर्मिगहॅम दिवाळखोर म्हणून घोषित

कोरोना साथीच्या आजारातून सावरण्यात अयशस्वी झाल्यानंतर अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी चिनी नेत्यांनी विविध धोरनात्मक उपाययोजना केल्या मात्र त्या पुरेशा नाहीत.चिनच्या मध्यवर्ती बँकेने लहान व्यवसायांसाठी काही करात सवलत देण्यासाठी उपाय योजना केल्या. परंतु खरेदीदारांच्या कमतरतेमुळे केलेले उपाय पुरेसे नसल्याचे दिसून आले.अनेक दशकांपासून वरचढ पोहचलेल्या चढणवाढीला आळा घालण्यासाठी गेल्या वर्षी फेडरेल रिझर्व्ह आणि युरोप,आशियातील बँकानी व्याजदर वाढवण्यास सुरुवात केल्यानंतर चिनी निर्याताची मागणी कमी झाली.

 

चीन अजूनही पाकिस्तानच्या पाठीशी

आर्थिक संकटाशी सतत झगडणाऱ्या पाकिस्तानसाठी चीन हा पाठीशी उभा आहे.पाकिस्तानची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी चीनने १ अब्ज डॉलर्सची मदतही केली आहे. पण इतरांच्या स्तिथीत सुधारणा घडवून आणताना चीन अडचणीत येण्याची भीती आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा