34 C
Mumbai
Thursday, October 29, 2026
घरबिजनेससुकामेव्याच्या दरात किलोमागे ६०० रुपयांपर्यंत वाढ

सुकामेव्याच्या दरात किलोमागे ६०० रुपयांपर्यंत वाढ

दिवाळीच्या फराळाला महागाईची झळ

Google News Follow

दिवाळीचा सण जवळ येताच बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग वाढली असताना सुकामेव्याच्या वाढत्या किमतींनी ग्राहकांचे आर्थिक गणित बिघडवले आहे. वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात गेल्या वर्षाच्या तुलनेत सुकामेव्याच्या दरात प्रतिकिलो २०० ते ६०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याने यंदा दिवाळीचा फराळ तयार करणे आणि नातेवाइकांना सुकामेव्याच्या भेटपेट्या देणे महागणार आहे. दिवाळीच्या मिठाईमध्ये काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोडाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तसेच सणासुदीच्या काळात सुकामेव्याच्या आकर्षक भेटपेट्यांना मागणी असते. मात्र, वाढलेल्या किमतींमुळे ग्राहकांना खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

वाशीच्या घाऊक बाजारात खाऱ्या पिस्त्याचे दर प्रतिकिलो १,९०० ते २,१०० रुपये, तर हिरव्या पिस्त्याचे दर ३,००० ते ३,२०० रुपये आहेत. बदाम १,१०० ते १,५०० रुपये, काजू ९५० ते १,५०० रुपये आणि अक्रोड ९०० ते २,२०० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. ममरा बदामाचे दर २,६०० ते ५,४०० रुपये, अंजीराचे दर १,००० ते २,४०० रुपये आणि चारोळीचे दर २,४०० ते २,८०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. मखाना १,४०० ते १,६०० रुपये, ब्राझील नट्स सुमारे ३,००० रुपये, तर पाइन नट्स ५,६०० ते ६,००० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहेत. त्यामुळे सुकामेव्याच्या भेटपेट्या खरेदी करताना ग्राहकांना आपल्या बजेटचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे.
हे ही वाचा:
सरकार आवडत नसेल तर निवडणूक लढवा!

शिक्षक मतदारसंघांत महायुतीचा विजय; पदवीधरांच्या तीनही जागा मविआकडे

न्यायालयावरील आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी संजय राऊतांची बिनशर्त माफी

भारताच्या दहशतवादविरोधी रणनीती युद्धसिद्ध!
सुकामेव्याबरोबरच वाळवलेल्या फळांच्या किमतीही ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचवत आहेत. बाजारात ब्लूबेरी १,४०० ते १,६०० रुपये, क्रॅनबेरी ६०० ते ८०० रुपये, वाळवलेला आंबा ७६० रुपये, संत्रे १,००० रुपये, चेरी ८०० रुपये आणि कीवी ५६० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. काळे प्लम, पोमेलो, अननस, लिंबू आणि पपई या वाळवलेल्या फळांचे दर प्रतिकिलो सुमारे ६०० रुपये आहेत. आले ७०० रुपये, तर ब्लॅक करंट ८०० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे. या पदार्थांचा वापर प्रामुख्याने मिठाई, विशेष खाद्यपदार्थ आणि महागड्या भेटपेट्यांमध्ये केला जात असल्याने त्यांच्याही किमतींचा परिणाम ग्राहकांच्या खर्चावर होत आहे.

सुकामेव्याच्या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील पुरवठ्यातील अडथळे, आयात शुल्क आणि वाढता वाहतूक खर्च ही प्रमुख कारणे असल्याचे घाऊक व्यापारी अमृत ढवळे यांनी सांगितले. इराण आणि अमेरिकेतून होणाऱ्या सुकामेव्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, बंदरांमधून अपेक्षित प्रमाणात मालाची आवक होत नसल्याने बाजारातील उपलब्धतेवर दबाव निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील या घडामोडींचा परिणाम देशांतर्गत किमतींवर होत असून, त्याची झळ किरकोळ ग्राहकांनाही बसत आहे. दिवाळीच्या काळात सुकामेव्याची मागणी वाढत असल्याने दरवाढीचा परिणाम अधिक जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा दिवाळीचा फराळ, मिठाई आणि भेटवस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांना अधिक खर्च करावा लागणार असून, सणाचा आनंद घेताना वाढत्या महागाईचे आव्हानही पेलावे लागणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा