28.2 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरबिजनेसॲमेझॉनमध्ये पुन्हा नोकरकपात

ॲमेझॉनमध्ये पुन्हा नोकरकपात

भारतीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का

Google News Follow

Related

जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने पुन्हा एकदा कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयाचा परिणाम भारतासह अमेरिका आणि ब्रिटनमधील कर्मचाऱ्यांवर झाला असून, हजारांपेक्षा कमी व्हाइट-कॉलर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भारतात सणासुदीच्या काळातील ऑनलाइन खरेदीला मोठी चालना मिळत असतानाच ॲमेझॉनने हा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनीच्या रिटेल व्यवसायातील पुनर्रचनेचा हा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.
ॲमेझॉनच्या ग्राहक सेवा, विक्रेता सेवा, मार्केटप्लेस सपोर्ट आणि स्टोअर्सशी संबंधित काही विभागांमध्ये या कपातीचा परिणाम झाल्याचे समोर आले आहे. मात्र, भारतात नेमक्या किती कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली, याचा अधिकृत आकडा कंपनीने जाहीर केलेला नाही. कंपनीने या निर्णयाचे समर्थन करताना संघटनात्मक रचना अधिक सुटसुटीत करण्यासोबतच व्यवसायातील महत्त्वाच्या क्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी ही फेररचना करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. खर्च कमी करणे आणि कामकाजाची कार्यक्षमता वाढवणे हा देखील या निर्णयामागील महत्त्वाचा उद्देश मानला जात आहे.
हे ही वाचा:
‘मेड इन इंडिया’ खेळण्यांचा जगभरात डंका

“पत्रकार परिषदेत आरोप नको, न्यायालयात पुरावे द्या”

सेन्सेक्स १,०४२ अंकांनी कोसळला

मोदींचा फॅन, राहुल गांधींच्या कट्टर विरोधकाला काँग्रेस कार्यकर्त्यांची मारहाण
ॲमेझॉनमध्ये गेल्या काही काळापासून कर्मचारी कपातीचे सत्र सुरू आहे. कोरोना महामारीच्या काळात ऑनलाइन खरेदीला प्रचंड मागणी वाढल्याने कंपनीने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी भरती केली होती. मात्र, महामारीनंतर बाजारातील परिस्थिती बदलली आणि ऑनलाइन खरेदीतील असामान्य वाढ काही प्रमाणात स्थिर झाली. त्यामुळे कंपनीकडे गरजेपेक्षा जास्त मनुष्यबळ निर्माण झाल्याचे ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यानंतर कंपनीने विविध विभागांची पुनर्रचना करत टप्प्याटप्प्याने कर्मचारी संख्या कमी करण्यास सुरुवात केली.
विशेष म्हणजे एकीकडे ॲमेझॉन कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे, तर दुसरीकडे पारंपरिक कॉर्पोरेट आणि रिटेल भूमिकांमध्ये कर्मचारी कपात केली जात आहे. त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगाराच्या बदलत्या स्वरूपावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे काम करण्याच्या पद्धती बदलत असताना कंपन्या कमी मनुष्यबळात अधिक काम करून घेण्यावर भर देत आहेत. ॲमेझॉनची ताजी नोकरकपात ही याच बदलत्या कॉर्पोरेट धोरणाचे आणखी एक उदाहरण मानली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा