28 C
Mumbai
Saturday, January 31, 2026
घरबिजनेसतुम्ही आमच्या सार्वभौमत्वावर टॅरिफ लावू शकत नाही!

तुम्ही आमच्या सार्वभौमत्वावर टॅरिफ लावू शकत नाही!

आनंद महिंद्रा, हर्ष गोएंका या उद्योगपतींनी टॅरिफ युद्धावर व्यक्त केली प्रतिक्रिया

Google News Follow

Related

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतर एकीकडे विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या असताना भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा आणि हर्ष गोएंका यांनी आपण सच्चे भारतीय असल्याचा दाखला दिला. बुधवारी अमेरिकेने भारतावर लावलेल्या अतिरिक्त २५ टक्के टॅरिफवर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. या आदेशानंतर, काही अपवाद वगळता भारतीय वस्तूंवर एकूण टॅरिफ ५० टक्क्यांवर पोहोचणार आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडून रशियन तेल खरेदी सुरू ठेवल्यामुळे दंडात्मक कारवाई म्हणून भारतातून येणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लावले. या निर्णयामुळे वस्त्रोद्योग, मत्स्य उद्योग आणि चामड्याच्या निर्यातीसारख्या क्षेत्रांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

“अमेरिकेने सुरू केलेल्या टॅरिफ युद्धात ‘अनपेक्षित परिणामांचा नियम’ गुप्तपणे काम करत आहे,” असे महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर दीर्घ प्रतिक्रिया देताना म्हटले.

आरपीजी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका म्हणाले, “तुम्ही आमच्या निर्यातीवर टॅरिफ लावू शकता, पण आमच्या सार्वभौमत्वावर नाही. टॅरिफ वाढवा — आम्ही आमचा निर्धार वाढवू, चांगले पर्याय शोधू आणि आत्मनिर्भरता निर्माण करू. भारत कोणासमोरही नतमस्तक होत नाही,” अशी पोस्ट त्यांनी ‘X’ वर केली.

हे ही वाचा:

‘हा युवा भारत आहे, झुकत नाही’

कॅन्सरसारख्या रोगांपासून संरक्षण देणारी सुंठ !

उत्तराखंड: ३५ वर्षानंतर पुन्हा एकत्र आलेला पुण्यातील २४ मित्रांचा गट बेपत्ता!

ही गोडी मेमरीच नव्हे तर इम्युनिटीही वाढवते…

आनंद महिंद्रा यांनी भारताने या परिस्थितीत कोणते पावले उचलावी यावर सुचना दिल्या. ते म्हणाले, भारताने केवळ टप्प्याटप्प्याने सुधारणा न करता गुंतवणुकीसाठी एक प्रभावी सिंगल-विंडो क्लीयरन्स सिस्टीम तयार करणे आवश्यक आहे. गुंतवणुकीसंबंधित अनेक नियम राज्य सरकारांच्या अखत्यारीत असले तरी, इच्छुक राज्यांच्या गटातून सुरुवात करता येईल. वेग, सोपेपणा आणि स्थिरता दाखवू शकलो, तर भारत जागतिक भांडवलासाठी अत्यंत आकर्षक ठिकाण बनू शकतो. पर्यटन हे परकीय चलन आणि रोजगाराचे सर्वात कमी वापरलेले स्त्रोतांपैकी एक आहे. व्हिसा प्रक्रिया वेगात करा, पर्यटकांसाठी सुविधा वाढवा आणि विद्यमान पर्यटन स्थळांभोवती टुरिझम कॉरिडॉर तयार करा. या कॉरिडॉरमध्ये सुरक्षितता, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा असाव्यात. अशा मॉडेल्स इतर राज्यांसाठी उदाहरण ठरतील आणि देशातील पर्यटन दर्जा उंचावेल.

महिंद्रांनी सुचवलेले उपाय

  • MSME साठी निधी आणि पाठबळ

  • इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणुकीत वेग

  • PLI योजनेद्वारे उत्पादनक्षमता वाढवणे

  • उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्क कमी करणे, जेणेकरून भारतीय उद्योग जागतिक स्पर्धेत टिकतील.

ट्रम्प यांच्या आदेशाचा तपशील:

६ ऑगस्ट रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी “रशियन फेडरेशन सरकारकडून अमेरिकेला होणाऱ्या धोक्यांविषयी” कार्यकारी आदेशावर सही केली. या आदेशानुसार, विद्यमान २५% टॅरिफ व्यतिरिक्त आणखी २५% टॅरिफ लावले जाणार आहे. प्राथमिक टॅरिफ ७ ऑगस्टपासून लागू होत आहे, तर अतिरिक्त टॅरिफ २७ ऑगस्टपासून लागू होईल.

आदेशात म्हटले आहे की, “भारत सरकार थेट किंवा अप्रत्यक्षपणे रशियन तेलाची आयात करत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या सीमाशुल्क क्षेत्रात भारतातून येणाऱ्या वस्तूंवर २५% अतिरिक्त शुल्क लावले जाईल.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा