अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाचा परिणाम केवळ शेअर बाजारावरच नव्हे, तर मौल्यवान धातूंच्या बाजारावरही दिसून आला आहे. सोमवारी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. डॉलरची ताकद वाढल्याने गुंतवणूकदारांनी नफा वसुलीला प्राधान्य दिल्याचे चित्र दिसून आले. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स)वर ५ ऑगस्ट २०२६ रोजी मुदतपूर्ती होणारा सोन्याचा करार मागील सत्रातील १,४३,४७८ रुपये प्रति १० ग्रॅम या बंद भावाच्या तुलनेत ८४५ रुपयांनी किंवा ०.५८ टक्क्यांनी घसरून १,४२,६३३ रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर खुला झाला.
सकाळी ९.४८ वाजेपर्यंत सोन्याच्या किमतींमध्ये आणखी घसरण होऊन भाव १,४२,०६४ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला होता. म्हणजेच मागील बंद भावाच्या तुलनेत १,४१४ रुपयांची किंवा ०.९९ टक्क्यांची घट झाली. दिवसभराच्या व्यवहारात सोन्याने १,४१,५५७ रुपये प्रति १० ग्रॅम हा नीचांक गाठला, तर १,४३,४७८ रुपये प्रति १० ग्रॅम हा उच्चांक राहिला. चांदीच्या किमतींमध्येही अशीच घसरण दिसून आली. ४ सप्टेंबर २०२६ रोजी मुदतपूर्ती होणारा चांदीचा करार मागील बंद भाव २,२२,६६४ रुपये प्रति किलोच्या तुलनेत ४,०१६ रुपये किंवा १.८० टक्क्यांनी घसरून २,१८,६४८ रुपये प्रति किलो या पातळीवर सुरू झाला.
चांदीचा भाव आणखी घसरून २,१८,४७६ रुपये प्रति किलो झाला होता. म्हणजेच त्यात ४,१८८ रुपयांची किंवा १.८८ टक्क्यांची घसरण झाली होती. दिवसाच्या व्यवहारात चांदीने २,१७,२७७ रुपये प्रति किलो हा नीचांक नोंदवला. जागतिक बाजारातही मौल्यवान धातूंवर दबाव कायम होता. कॉमेक्सवर सोन्याचा भाव १.२७ टक्क्यांनी घसरून ४,०६१ डॉलर प्रति औंस, तर चांदीचा भाव ०.५८ टक्क्यांनी घसरून ५८ डॉलर प्रति औंस इतका नोंदवला गेला.
हे ही वाचा:
तेल दरवाढीने पाकिस्तानची कोंडी; पेट्रोल, बस-रिक्षा, मालवाहतुकीचे दर वाढले
पश्चिम बंगालमध्ये लागू झालेला ‘गुंडा दमन कायदा’ काय आहे?
पेन्शन काढायला गेलेल्या ८२ वर्षीय वृद्धाच्या खात्यात दिसले ७५९ कोटी!
संरक्षण क्षेत्रात क्रांती! ‘अस्त्र’ क्षेपणास्त्र निर्मितीत खासगी कंपन्यांचा सहभाग
बाजार विश्लेषकांच्या मते, अमेरिका-इराण संघर्षामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा कल बदलला असून अमेरिकन डॉलरला बळकटी मिळाली आहे. डॉलर निर्देशांक १००.९० या पातळीवर पोहोचल्याने सोने आणि चांदीवरील दबाव वाढला. दरम्यान, व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांनंतर अमेरिकेने इराणमधील काही लष्करी ठिकाणांवर हवाई कारवाई केली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कुवेत, बहरीन आणि जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढला असून त्याचे पडसाद जागतिक आर्थिक बाजारांवर उमटत आहेत.
