29.3 C
Mumbai
Monday, October 31, 2022
घरअर्थजगतकेंद्राकडून महाराष्ट्राला या दोन प्रकल्पांची भेट

केंद्राकडून महाराष्ट्राला या दोन प्रकल्पांची भेट

२ हजार रोजगार उपलब्ध होणार

Google News Follow

Related

महाराष्ट्रातून गुंतवणूक राज्याबाहेर गेल्याच्या आरोपांच्या गदारोळातच दोन नवीन प्रकल्प राज्यात येत आहेत. केंद्र सरकारने दोन हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली आहे.पुण्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे. यातून २ हजार रोजगार निर्मिती होईल असे चंद्रशेखर म्हणाले.

इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्पाबरोबरच सीडँकचा एक इलेक्ट्रॉनिक्स डिझाईनिंग प्रकल्पही महाराष्ट्रात येणार आहे. या प्रकल्पात साधारण एक कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे चंद्रशेखर म्हणाले. देशातील स्टार्ट-अपला प्रोत्साहन देण्याचा उद्देश यामागे असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणातंर्गत रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरला मंजुरी देण्यात आली आहे. सुमारे २९७.११ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या क्लस्टर प्रकल्पातून ५,००० रोजगार निर्मिती होईल असे सांगण्यात येत आहे. प्रकल्पासाठी एकूण ४९२. ८५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला २०७. ९८ कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे म्हटल्या जात आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पुण्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्लस्टर विकसित करण्यावर काम करत आहे. कंझ्युमर ड्युरेबल्स कंपनी आयएफबी रेफ्रिजरेशन हे अँकर युनिट असेल.

हे ही वाचा:

भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू

मुंबई महापालिकेच्या कामांची होणार ‘कॅग’कडून चौकशी

मोरबी दुर्घटनेत १३२ लोकांचा मृत्यू, अनेकांना वाचवण्यात पथकाला यश

भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पण पाकिस्तानची गोची

देशात तामिळनाडू, कर्नाटक, नोएडा, तिरूपती, आणि आता पुण्यातील रांजणगाव येथे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे असेही ते म्हणाले. पुण्यातील सीडॅक लवकरच महाराष्ट्रात भारत सेमीकंडक्टर मोहीमअंतर्गत स्टार्टअप्ससाठी पुण्यात रोड शो आयोजित करेल. भारत सरकार सेमीकंडक्टर डिझाइन स्टार्टअप्समध्ये थेट गुंतवणूक करेल,” मंत्री चंद्रशेखर म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,956चाहतेआवड दर्शवा
1,957अनुयायीअनुकरण करा
46,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा