30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
घरअर्थजगतरेल्वेचे २०२०-२१ करता डबे निर्मीतीचे नवे ध्येय

रेल्वेचे २०२०-२१ करता डबे निर्मीतीचे नवे ध्येय

२०१९-२०२० करता ‘आय.सी.एफ’ने ४,२३८ डब्यांच्या बांधणीचे लक्ष्य निर्धारीत केले होते. कोविड-१९च्या टाळेबंदीमुळे ४,१६६ डब्यांचे उत्पादन झाले आहे.

Google News Follow

Related

कोविड-१९च्या टाळेबंदीचा परिणाम म्हणून, भारतीय रेल्वेच्या डबा उत्पादक कारखान्याच्या (आय.सी.एफ) २०२०-२१ च्या लक्ष्यात घट करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेतील आय.सी.एफ च्या उत्पादन लक्ष्यात ५० टक्क्यांची घट करण्यात आली आहे. मात्र तरीही, टाळेबंदीचे निर्बंध डिसेंबर पासून उठवल्यानंतर आय.सी.एफच्या कारखान्यात पूर्ण क्षमतेने उत्पादन चालू आहे. त्यामुळे उत्पादन लक्ष्य २०-२५ टक्क्यांनी वाढवले जाऊ शकते असे सुत्रांनी सांगितले आहे. 

२०२०-२१ या वर्षात २,०४५ डबे उत्पादन करण्याचे लक्ष्य आय.सी.एफ ने निर्धारित केले आहे. मागील वर्षी २०१९-२० मध्ये ४,१६६ डबे बनविण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले होते. डिसेंबर २०२० पर्यंत १,४२७ डब्यांचे उत्पादन पूर्ण झाले होते. 

२०१९-२०२० मध्ये ४,२३८ डब्यांचे लक्ष्य ठरविण्यात आले होते. टाळेबंदीचा परिणाम म्हणून डिसेंबर पर्यंत ४,१६६ डब्यांचे उत्पादन होऊ शकले. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारखान्यात १०० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ ५ टक्के अनुपस्थिती नोंदली गेली आहे. टाळेबंदीमुळे उत्पादनात मोठा खंड पडला होता, जो आता आम्ही दिवस-रात्र मेहेनत करून भरून काढू. त्यामुळे २०२०-२१ मधील लक्ष्य वाढण्याची आमची आशा आहे. कोरोना टाळेबंदीच नकारात्मक परिणाम झाला असला तरीही या वर्षी आय.सी.एफ ने नऊ मेमू (एम.इ.एम.यु) गाड्यांचे उत्पादन केले आहे. हा एक विक्रमच असल्याचे देखील समजले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा