25 C
Mumbai
Tuesday, January 27, 2026
घरबिजनेसनॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने पार केला २३ कोटी गुंतवणूकदार खात्यांचा टप्पा

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने पार केला २३ कोटी गुंतवणूकदार खात्यांचा टप्पा

३० जून २०२५ पर्यंत NSE चा IPF वार्षिक २२% वाढीसह ₹२,५७३ कोटींवर पोहोचला

Google News Follow

Related

भारतीय नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने जुलै २०२५ मध्ये आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. एप्रिल २०२५ मध्ये २२ कोटी गुंतवणूकदार खाती पार केल्यानंतर केवळ तीन महिन्यांत NSE वर एकूण २३ कोटी (२३० दशलक्ष) युनिक ट्रेडिंग खाती नोंदवली गेली आहेत. हे भारतात वाढत्या प्रमाणावर होत असलेल्या किरकोळ गुंतवणूकदार सहभागाचे स्पष्ट उदाहरण आहे.

२८ जुलै २०२५ पर्यंत NSE वर युनिक नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या ११.८ कोटी इतकी आहे. एकाच गुंतवणूकदाराची एकापेक्षा अधिक ब्रोकर्सकडे खाती असू शकतात, म्हणून अनेक क्लायंट कोड्स असणे शक्य आहे.

प्रत्येक प्रदेशानुसार खात्यांची आकडेवारी

महाराष्ट्र – सुमारे ४ कोटी खाती (१७%)

उत्तर प्रदेश – २.५ कोटी (११%)

गुजरात – २ कोटींहून अधिक (९%)

पश्चिम बंगाल व राजस्थान – प्रत्येकी १.३ कोटींपेक्षा अधिक (६%)

ही पाच राज्ये एकत्रितपणे सुमारे ५०% खात्यांचे प्रतिनिधित्व करतात, तर पहिल्या १० राज्यांमध्ये जवळपास ७५% खाती आहेत.

हे ही वाचा:

ट्रम्प मोदींच्या विरोधात तोच जुना खेळ खेळणार काय?

निवडणूक आयोगाने बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांचे मानधन वाढवले

“मी मिलिंदला बरेचदा ओरडते”

मुलांमध्ये दमा उपचारांसाठी नवीन आशा

सध्या मोठ्या प्रमाणात तरुण आणि पहिल्यांदाच गुंतवणूक करणारे लोक शेअर बाजारात सहभागी होत आहेत. त्यांना योग्य दिशा देण्यासाठी SEBI आणि NSE द्वारे विविध जागरूकता उपक्रम राबवले जात आहेत, ते असे- जोखीम व्यवस्थापन, फसवणुकीपासून संरक्षण, दीर्घकालीन गुंतवणुकीची शिस्त.

गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम (IAPs):

मागील ५ वर्षांत NSE ने गुंतवणूकदार शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी भर घातली आहे. आर्थिक वर्ष २०२० मध्ये – ३,५०४ कार्यक्रम, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये – १४,६७९ कार्यक्रम, सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण ८ लाखाहून अधिक सहभागी

३० जून २०२५ पर्यंत NSE चा IPF वार्षिक २२% वाढीसह ₹२,५७३ कोटींवर पोहोचला आहे, जो गुंतवणूकदार संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

गेल्या पाच वर्षांत Nifty 50 ने वार्षिक १७% पेक्षा जास्त परतावा दिला. Nifty 500 ने वार्षिक २०% पेक्षा जास्त परतावा दिला.

वाढीमागील कारणे अशी : डिजिटायझेशनचा विस्तार, फिनटेक सुविधांची उपलब्धता, वाढती मध्यमवर्गीय संख्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेली धोरणं.

NSE चे मुख्य व्यवसाय विकास अधिकारी श्रीराम कृष्णन म्हणतात, “२३ कोटी खात्यांचा टप्पा पार करणे ही भारताच्या भांडवली बाजारांवरील लोकांचा विश्वास वाढत असल्याचे लक्षण आहे. वेगाने होत असलेले डिजिटायझेशन, मोबाईल ट्रेडिंग सुविधा आणि गुंतवणूकदार साक्षरता कार्यक्रमांमुळे लहान शहरांतील नागरिकांसाठीही बाजार खुले झाले आहेत.”

त्यांनी असेही नमूद केले की आज गुंतवणूकदार केवळ इक्विटी नव्हे, तर ETFs, REITs, InvITs आणि डेट इंस्ट्रुमेंट्स मध्येही गुंतवणूक करत आहेत, ज्यामुळे भारतात गुंतवणुकीचे स्वरूप अधिक वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक होत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा