डॉलरसमोर रुपयाची दमदार मुसंडी

सलग दुसऱ्या दिवशी भारतीय चलन मजबूत

डॉलरसमोर रुपयाची दमदार मुसंडी

भारतीय रुपयाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन करत अमेरिकन डॉलरसमोर मजबूत कामगिरी केली आहे. शुक्रवारी सकाळच्या व्यवहारात रुपया तब्बल १८ पैशांनी मजबूत होत ९६.१८ प्रति डॉलर या स्तरावर पोहोचला. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी रुपयात वाढ झाली असून गेल्या दोन दिवसांत भारतीय चलनाने जवळपास ७० पैशांची भरारी घेतली आहे. यामुळे विदेशी चलन बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव काहीसा कमी झाल्याने आणि कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर राहिल्याने रुपयाला मोठा आधार मिळाला आहे. पश्चिम आशियातील परिस्थिती सुधारण्याचे संकेत मिळाल्यानंतर जागतिक बाजारातही सकारात्मक वातावरण दिसून आले. याचा थेट फायदा भारतीय चलनाला झाला. याशिवाय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे.
हे ही वाचा:
भोजशाळेत आता नमाज नाही…पोलिस अधिकारी सचिन शर्मांची सक्त ताकीद

गाई, म्हशींची कत्तल इस्लामच्या धार्मिक सणांचा भाग नाही…याचिका फेटाळल्या

वेदांताचा ४५ हजार कोटींच्या कर्जफेडीसाठी मोठा प्लॅन

व्हेनेझुएलाच्या तेलाकडे भारताचा वाढता कल

शुक्रवारी इंटरबँक विदेशी चलन बाजारात रुपया ९६.३० वर उघडला आणि काही वेळातच ९६.१८ पर्यंत मजबूत झाला. याआधी गुरुवारी रुपया ५० पैशांनी मजबूत होऊन ९६.३६ वर बंद झाला होता. काही दिवसांपूर्वी रुपया ९७ च्या जवळ पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आता परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे दिसत आहे.

Exit mobile version