भारतीय भांडवली बाजार नियामक सेबीने आर्थिक प्रभावक (finfluencer) अवधूत साठे या अवधूत साठे ट्रेडिंग अकादमीच्या संस्थापकांवर आतापर्यंतची सर्वात कठोर कारवाई करत त्यांना सिक्युरिटीज मार्केटमधून प्रतिबंधित केले आहे आणि ५४६ कोटी रुपये जप्तीचे आदेश दिले आहेत.
सेबीने म्हटले की, ही रक्कम अनधिकृत गुंतवणूक सल्ला देण्याच्या अवैध व्यवहारातून जमा करण्यात आली असून, यामुळे हजारो किरकोळ गुंतवणूकदारांची दिशाभूल झाली आहे.
४ डिसेंबर रोजी जारी आदेश हा फिनफ्लुएंसर क्षेत्रावर नियंत्रण आणण्याच्या सेबीच्या मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. अनेक “ट्रेडिंग ट्रैनर” शिक्षणाच्या नावाखाली थेट स्टॉक सल्ले, लाईव्ह ट्रेडिंग कॉल्स, बाय-सेल सिग्नल्स देतात, तेही कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय.
हे ही वाचा:
पुतिन यांच्यासमोर बोलताना पंतप्रधान मोदींनी पहलगाम हल्याचा केला उल्लेख; काय म्हणाले?
राष्ट्राध्यक्ष पुतीन भारतात; मोदी–पुतीन यांची जादू की झप्पी!
‘इंडिगो’ची ५५० हून अधिक उड्डाणे रद्द! कारण काय?
प्रकरण SEBI च्या निदर्शनास कसे आले?
SEBI ची चौकशी तक्रारींनंतर सुरू झाली. तक्रारींमध्ये म्हटले होते की, साठे सर फक्त ट्रेडिंग कोर्सेस करत नव्हते, तर लाईव्ह मार्केटमध्ये बाय व सेल कॉल्स देत होते, ज्यामुळे हा उपक्रम शिक्षण नसून इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायझरीचा प्रकार ठरत होता.
त्यानंतर SEBI ने खालील पुरावे तपासले, ज्यात व्हिडिओ फुटेज, व्हॉट्सअॅप ग्रुप मेसेजेस, सोशल मीडिया कंटेंट, पेमेंट स्ट्रक्चर, सहभागींची साक्ष एका उदाहरणात SEBI ने दाखवले साठे यांनी लाईव्ह ट्रेडिंगदरम्यान Bank Nifty Futures मध्ये नेमक्या किंमतीवर एंट्री घ्या, इथं स्टॉप-लॉस, इथं टार्गेट अशी थेट सूचना दिली.
सेबीने म्हटले आहे की, हे शिक्षण नसून गुंतवणूक सल्ला आहे. आदेशात नमूद केले आहे की, “त्यांची भूमिका साध्या प्रशिक्षणापुरती मर्यादित नव्हती. त्यांनी विशिष्ट एंट्री-एग्झिट पॉइंट्स दिले. जे केवळ गुंतवणूक सल्लागार करते.”
सेबीने असेही आढळले की “काउंसिलिंग बॅचेस”च्या नावाखाली खाजगी व्हॉट्सअॅप ग्रुप्स, तात्काळ ट्रेडिंग सूचना, शेकडो सदस्य, मोठ्या फी याद्वारे साठे आणि टीम थेट ट्रेडिंग मार्गदर्शन देत होती.
सेबीचे कठोर आदेश
सेबीने पुढील आदेश दिले, १. अवधूत साठे, ASTA आणि संचालिका गौरी साठे पूर्णपणे मार्केटमधून बाहेर असतील, कोणताही सिक्युरिटी व्यवहार (खरेदी/विक्री) ते करू शकत नाहीत, कोणतेही इन्व्हेस्टमेंट ऍडव्हाजरी कार्य करू शकत नाहीत, लाईव्ह ट्रेडिंग सेशन्समध्ये सुचना देणे पूर्णतः बंद केले आहे. २. बँक खात्यांवर निर्बंध घालण्यात आली असून त्यांची सर्व सर्व खाती गोठवा. ५४६ कोटी रुपये सेबीच्या देखरेखीखाली एफडीमध्ये रूपांतरित करा. ३. संपूर्ण आर्थिक तपशील जमा करण्याचा आदेश त्यांनी सेबीला द्यावेत.
५४६ कोटींची जप्ती ही भारतातील फिनफ्लुएंसरविरुद्धची इतिहासातील सर्वात मोठी कारवाई आहे. सेबीने यातून संदेश दिला आहे की, सेबी म्हणाले की, साठे यांचा प्रभाव अत्यंत व्यापक होता. हजारो लोकांनी मोठ्या फी भरून त्यांच्या पद्धती “कधीच फेल होत नाहीत” असा समज करून घेतला होता. “त्यांचे वर्तन गुंतवणूकदारांसाठी आणि भांडवली बाजारासाठी गंभीर जोखीम ठरते. त्यामुळे तात्काळ कारवाई आवश्यक होती.”







