सिंगापूरचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री लॉरेन्स वॉन्ग हे २ ते ४ सप्टेंबर २०२५ दरम्यान अधिकृत भारत दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून हा दौरा होत असून, भारत आणि सिंगापूरमधील राजनैतिक संबंध स्थापनेच्या ६० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. सिंगापूरच्या पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली.
नवी दिल्लीतील भेटीदरम्यान, पंतप्रधान वॉन्ग राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट घेतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक करतील. मोदी यांच्या वतीने त्यांच्या सन्मानार्थ एक विशेष बँक्वेट लंचही आयोजित करण्यात येणार आहे. सिंगापूरचे पंतप्रधान म्हणून पंतप्रधान वोंग यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे.
या दौऱ्यात पंतप्रधान वॉन्ग यांची केंद्रीय आरोग्य आणि रसायन व खत मंत्री जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत स्वतंत्र बैठकाही होणार आहेत. तसेच, वॉन्ग राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.
सिंगापूर – भारत राजनैतिक संबंधांच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आणि सिंगापूरच्या स्वातंत्र्याच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त (SG60) आयोजित स्वागत समारंभात पंतप्रधान वॉन्ग परदेशातील सिंगापूरवासी आणि डायस्पोरा यांना भेटतील.
पंतप्रधान वॉन्ग यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री विवियन बालकृष्णन, परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अर्थ राज्यमंत्री जेफ्री सिओ, परराष्ट्र आणि व्यापार आणि उद्योग राज्यमंत्री गान सिओ हुआंग आणि पंतप्रधान कार्यालय, परराष्ट्र मंत्रालय, व्यापार आणि उद्योग मंत्रालय, वाहतूक मंत्रालय आणि डिजिटल विकास आणि माहिती मंत्रालयाचे अधिकारी असतील.
पंतप्रधान वॉन्ग यांच्या अनुपस्थितीत, राष्ट्रीय सुरक्षा समन्वय मंत्री आणि गृहमंत्री के षणमुगम हे सिंगापूरमध्ये कार्यवाहक पंतप्रधान असतील, असे निवेदनात म्हटले आहे.
हे ही वाचा :
‘आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान’: स्वदेशीसाठी भाजपचा तीन महिन्यांचा उपक्रम!
भारताची अफगाणिस्तानला भक्कम साथ; भूकंपग्रस्तांसाठी मदतीचा हात!
जरांगेना मैदान रिकामे करण्याची नोटीस!
सुप्रिया सुळेंच्या गाडीवर आंदोलकांनी का भिरकावल्या बाटल्या ?
आमच्या ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणासह सिंगापूर हा भारताचा एक महत्त्वाचा भागीदार आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये पंतप्रधान मोदींच्या सिंगापूर दौऱ्यादरम्यान, द्विपक्षीय संबंध व्यापक धोरणात्मक भागीदारीपर्यंत उंचावले गेले, असे परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Singapore PMO says, "Prime Minister and Minister for Finance Lawrence Wong will make an Official Visit to India (New Delhi) from 2 to 4 September 2025, at the invitation of Prime Minister of India, Narendra Modi. Prime Minister Wong’s introductory visit coincides with the 60th… pic.twitter.com/99GgIx5ttn
— ANI (@ANI) September 2, 2025







