भारत पुढील दोन दशकांत जगातील सर्वात प्रभावशाली राष्ट्रांपैकी एक ठरणार आहे. अशा निर्णायक टप्प्यावर विवान कारुळकर याचे VK कॅपिटल हे पाऊल नवीन पिढीची गुंतवणूक व मार्गदर्शक व्यासपीठ ठरणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर VK कॅपिटलची ही मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. दरम्यान, विवानने आपला ‘विवान्स पॉडकास्ट’ सुरू केला आहे. त्या माध्यमातून समाजातील अग्रगण्य व्यक्तींशी संवाद साधून त्यांच्या भूमिका लोकांसमोर ठेवल्या जाणार आहेत.

VK कॅपिटलचा मूळ आधार आहे, “भारत”. अर्थात, भारताची ओळख, वारसा आणि सामर्थ्य यांचा गौरव य़ाद्वारे राष्ट्राभिमानाची जपणूक, हजारो वर्षांच्या परंपरा, मूल्ये आणि सामाजिक वारसा आधुनिक काळातही पुढे नेत सांस्कृतिक सातत्य राखणे, परकीय अवलंबित्व कमी करून स्वदेशी उपाय, तंत्रज्ञान आणि उद्योगांद्वारे विकास साधून स्वावलंबनाचा संदेश देणे. ही तिन्ही मूल्ये लक्षात घेऊन संस्था अशा प्रकल्पांना पाठबळ देणार आहे, जे भारताच्या २० वर्षांच्या भविष्यात निर्णायक भूमिका बजावतील.
VK कॅपिटलचा उद्देश फक्त पैसा गुंतवणे नाही. तर नेतृत्व घडवणे, तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे, सर्वसमावेशक विकास साधणे, सुदृढ संस्थांची उभारणी करणे ही त्यांची उद्दिष्टे आहेत. यातून भारताचे महत्त्वाच्या क्षेत्रांतील सार्वभौमत्व टिकवणे आणि ती अधिक बळकट करणे हा मुख्य हेतू आहे.

भारत आज एका अशा वळणावर उभा आहे, जिथे संधी आणि जबाबदारी यांचा उत्तम मिलाफ झालेला आपल्याला पाहायला मिळतो: त्यात लोकसंख्येचा लाभ, जलद गतीने वाढणाऱ्या तंत्रज्ञानाचा स्वीकार, बदलणाऱ्या पुरवठा साखळ्या आणि स्वदेशी उपाययोजनांची वाढती भूक आपल्याला पाहायला मिळते.
हे ही वाचा:
विनापरवाना राष्ट्रभक्ती शिकवल्याने डीएमके नाराज; ३९ स्वयंसेवकांना घेतले ताब्यात!
‘आय लव्ह मोहम्मद’: बरेलीमध्ये हॉल सील केल्याने ६०० लग्नांचे नियोजन कोलमडले!
“हडळ” स्वतःच्या लोकांना मारतेय! पाक सैन्य आणि सरकारबद्दल पीओकेमधील नेते काय म्हणाले?
आरएसएफच्या ड्रोन हल्ल्यात ८ नागरिकांचा मृत्यू
तरीदेखील, अनेक प्रतिभावान उद्योजकांना कमतरता जाणवत आहे ती, दीर्घकालीन गुंतवणुकीची, विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन, आणि दीर्घकालीन राष्ट्रीय प्रकल्पाशी संलग्नता या गोष्टींची. ही पोकळी भरून काढण्यासाठी VK कॅपिटल कार्यरत होणार आहे. VK कॅपिटल ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. दीर्घकालीन दृष्टीकोन लक्षात घेऊन आवश्यक तेवढे भांडवल उपलब्ध करून देणे, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवून देणे, तसेच नवकल्पनांना बाजारपेठ, धोरणनिर्माते आणि समाजोपयोगी कार्यात सहभागी होणाऱ्या भागीदारांशी जोडणारे नेटवर्क उपलब्ध करून देणे — या सर्व माध्यमांतून VK कॅपिटल उद्योजक आणि नवप्रवर्तकांना सक्षम करणार आहे.”
VK कॅपिटलचा मार्ग घोषवाक्यापुरता नाही, तर एक आवाहन आहे. ज्या माध्यमातून देशाचे स्वावलंबित्व बळकट होते, तसेच दीर्घकालीन धोरणात्मक कौशल्यांचा विकास घडतो — जसे की प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, शाश्वत शेती, आरोग्यसेवेचा पुरवठा, सर्वसमावेशक आर्थिक तंत्रज्ञान आणि विविध संकटाना, आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्याच्या क्षमतेत भर घालतात, अशा प्रकल्पांना VK कॅपिटलमध्ये प्राधान्य दिले जाईल.
तरुणांची बौद्धिक ऊर्जा, सामाजिक उद्देशाची परंपरा, व्यवहार्य गुंतवणूक संरचना यातून भारताचे भविष्य घडविण्यासाठी VK कॅपिटल हे माध्यम म्हणून उपयुक्त ठऱणार आहे. विवान कारुळकरच्या नेतृत्वाखाली VK कॅपिटल हे नवी दृष्टी आणि अंमलबजावणी यातील दुवा ठरणार आहे.
जे लोक महान भारताचा विचार करतात, अशा लोकांमध्ये गुंतवणूक करणे आणि त्यांना ते भविष्य वास्तवात आणण्यासाठी साधने, मार्गदर्शन व संसाधने उपलब्ध करून देणे हे VK Capital चे उद्दिष्ट आहे. अद्वितीय अशा संकल्पनांचे बीजारोपण करून उद्याचा आत्मनिर्भर भारत घडवणे, हे VK कॅपिटलचे बलस्थान असेल.!







