30 C
Mumbai
Wednesday, November 18, 2026
घरक्राईमनामाकार्टर रोडवर रील शूटिंगदरम्यान अभिनेत्रीची बॅग चोरीला

कार्टर रोडवर रील शूटिंगदरम्यान अभिनेत्रीची बॅग चोरीला

खार पोलिसांत गुन्हा दाखल

Google News Follow

वांद्रे पश्चिम येथील कार्टर रोड परिसरात इन्स्टाग्राम रीलचे शूटिंग सुरू असताना एका अभिनेत्रीची बॅग चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या बॅगेत रोख रक्कम, मेकअपचे साहित्य आणि अन्य वस्तू असा एकूण ४३ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता. याप्रकरणी खार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

सिमरन कवलजीत सिंग राणा (३०) असे तक्रारदार अभिनेत्रीचे नाव आहे. मंगळवारी दुपारी साडेएकच्या सुमारास ती एका स्किनकेअर कंपनीच्या टीमसोबत प्रमोशनल रील शूट करण्यासाठी कार्टर रोड पोलीस चौकीजवळील समुद्रकिनारी गेली होती. सुरुवातीला तिने आपली काळ्या रंगाची हँडबॅग कंपनीच्या कारमध्ये ठेवली होती. मात्र, शूटिंग सुरू असताना कंपनीतील एका कर्मचाऱ्याने ही बॅग कारमधून आणून समुद्रकिनाऱ्याजवळील कठड्यावर ठेवली.

हे ही वाचा:
न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज!

महाराष्ट्राच्या धरणांमधील पाणीसाठा ६४ टक्क्यांवर!

काश्मीरमधील शेवटचा ज्ञात स्थानिक लश्कर दहशतवादी ठार

अमेरिकेतून हद्दपार होताच खलिस्तान समर्थकाला अटक

शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सिमरनने बॅगेबाबत विचारणा केली. त्यावेळी बॅग कठड्यावर ठेवल्याचे तिला सांगण्यात आले. मात्र, तिथे बॅग आढळून आली नाही. परिसरात शोध घेऊनही बॅग न सापडल्याने तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.

चोरीला गेलेल्या बॅगेत २५ हजार रुपयांचे मेकअप साहित्य, १५ हजार रुपयांच्या चाव्या, साडेतीन हजार रुपये रोख, कपडे, चप्पल, मोबाईल चार्जर आणि इअरफोन असा एकूण ४३ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता. अज्ञात व्यक्तीने बॅग चोरल्याचा संशय तिने तक्रारीत व्यक्त केला आहे. खार पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा