27 C
Mumbai
Sunday, April 5, 2026
घरक्राईमनामा​मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी ३.३७ कोटींचे १५४१ मोबाईल मूळ मालकांना परत

​मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी ३.३७ कोटींचे १५४१ मोबाईल मूळ मालकांना परत

मोबाईलची अंदाजे किंमत १ कोटी ३५ लाख ७१ हजार रुपये

Google News Follow

Related

मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडळ ३ च्या पथकाने मागील काही महिन्यांत चोरीला गेलेले आणि हरविलेले मोबाईल शोधून काढण्यात मोठे यश संपादन केले आहे. ४ एप्रिल रोजी आयोजित एका कार्यक्रमात हस्तगत करण्यात आलेली मालमत्ता त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहे. ​​मागील तीन महिन्यांच्या कालावधीत परिमंडळ ३ अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांनी सी.ई.आय.आर (CEIR) पोर्टल, सायबर सेल आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या मदतीने एकूण ६६२ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. या हस्तगत केलेल्या मोबाईलची अंदाजे किंमत १ कोटी ३५ लाख ७१ हजार रुपये इतकी आहे. याव्यतिरिक्त ३० लाख ५४ हजार रुपये किमतीचा इतर मुद्देमालही पोलिसांनी शोधून काढला असून, आज एकूण १ कोटी ६६ लाख २५ हजार रुपयांची मालमत्ता मालकांना सोपवण्यात आली.
हे ही वाचा:
इराणी तेल कार्गो चीनकडे वळवण्यासंबंधीचे दावे खोटे!

पश्चिम आशियातील तणावामुळे दुबई रिअल इस्टेट बाजारात घसरण

राघव चढ्ढा म्हणाले, घायल हूं इसलीए घातक हूं

सोनं स्वस्त होताच मुंबईत खरेदीला वेग
​परिमंडळ ३ मधील ​नागपाडा पोलिस ठाणे १३९ मोबाईल,​वरळी १०८ मोबाईल, ​ताडदेव १०५ मोबाईल, ​ना. म. जोशी मार्ग १०४ मोबाईल,​आग्रीपाडा १०३ मोबाईल,​भायखळा १०३ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.​पोलीस उपायुक्त, परिमंडळ ३ यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत तीन मोठ्या मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. या तिन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून पोलिसांनी एकूण १५४१ मोबाईल आणि इतर मालमत्ता हस्तगत केली असून, त्याची एकूण किंमत ३ कोटी ३७ लाख ४४ हजार ५०० रुपये इतकी आहे.
​या मोहिमेत ज्या पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व अंमलदारांनी सरासरीपेक्षा जास्त मोबाईल हस्तगत करून उत्तम कामगिरी केली, त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ३), सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत पार पडला.​पोलीस प्रशासनाच्या या कामगिरीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, आपले हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने मालकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा