पौड नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीची विटंबना, चांद शेखला अटक

ग्रामस्थांचा संतप्त मोर्चा,

पौड नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीची विटंबना, चांद शेखला अटक

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड येथे नागेश्वर मंदिरातील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर लघुशंका केल्याच्या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता ही संतापजनक घटना घडली. हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या १९ वर्षीय चांद नौशाद शेख आणि त्याचे वडील नौशाद शादाब शेख (४४) यांना अटक करण्यात आली आहे.

यासंदर्भातील सीसीटीव्हीचे फूटेज समोर आले आहे. त्यात हा चांद शेख मंदिरात शिरून हे घृणास्पद कृत्य करताना दिसतो आहे. त्याने मंदिरातील अन्नपूर्णेची मूर्ती खाली पाडून तिची विटंबना केली. या घटनेनंतर आता तिथे मंदिरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा तपास पौड पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मुळशी तालुक्यातील मुख्य चौकात नाकाबंदी करण्यात आली आहे. हे कृत्य लक्षात आल्यानंतर नागरिकांनी संबंधित आरोपीला चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेबाबत शिवाजी वाघवले यांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

हे ही वाचा:

एनडीएमध्ये जागावाटपावर कोणताही वाद नाही

खोल दरीत कोसळले सैन्याचे वाहन, ३ जवानांचा मृत्यू

मनोज तिवारींचा राहुल गांधींवर निशाणा

पंजाब पोलिसांनी दोन हेरांना केली अटक

या घटनेनंतर ग्रामस्थांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांनी पौड पोलिस ठाण्याला निवेदन सादर केले. या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

Exit mobile version