बरेलीत ७ वर्षांपासून ‘बंगाली डॉक्टर’ बनून राहणारा बांगलादेशी अटकेत!

पोलिसांनी बनावट आधार-पॅन कार्ड जप्त

बरेलीत ७ वर्षांपासून ‘बंगाली डॉक्टर’ बनून राहणारा बांगलादेशी अटकेत!

उत्तर प्रदेशातील बरेली येथे पोलिसांनी बांगलादेशी डॉक्टर राज मंडल याला अटक केली आहे जो भारतात बेकायदेशीरपणे राहत होता. तो २०१७ मध्ये एक वर्षाच्या व्हिसावर भारतात आला होता परंतु जुलै २०१८ मध्ये त्याचा व्हिसाची मुदत संपल्यानंतरही तो बेकायदेशीरपणे बरेलीमध्ये राहत होता आणि क्लिनिक चालवत होता.

पोलिसांनी सांगितले की, राज मंडल हा ढाक्याचा रहिवासी आहे. तो बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र बनवून भारतीय नागरिक असल्याचे भासवत असे. बरेलीच्या फतेहगंज पश्चिम भागातील बलिया गावात तो ‘बंगाली डॉक्टर’ म्हणून ओळखला जात असे आणि लोकांना किरकोळ औषधे देत असे. पोलिसांनी सांगितले की, त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पात्रता नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी (४ सप्टेंबर) फतेहगंज पश्चिम पोलिस ठाण्याने एका खबऱ्याच्या माहितीवरून त्याला अटक केली. राज मंडल इतक्या वर्षांपासून भारतात कसा राहू शकला, तो कोणाच्या संपर्कात होता आणि त्याच्या नेटवर्कमध्ये आणखी कोण सामील आहे याचा तपास आता पोलिस करत आहेत. 

हे ही वाचा : 

कुलगाम चकमक: एक दहशतवादी ठार, तीन जवान जखमी!

शशी थरूर म्हणतात, भारत झुकेगा नही!

कर्नाटक: गणेश विसर्जनादरम्यान इस्लामिक कट्टरपंथीयांचा गोंधळ, २१ जणांना अटक!

युवकांना रोजगाराशी जोडण्यासाठी मिशन मोडमध्ये योगी सरकार

दरम्यान, देशभरातून आतापर्यंत अनेक बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. पोलिस अशा घुसखोरांना शोधण्यासाठी विशेष शोधमोहीम राबवत आहेत. घुसखोरांना अटक करून त्यांची बांगलादेशात रवानगी करण्यात आली, येत आहे.

Exit mobile version