पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीच्या अतिरिक्त जिल्हा आयुक्तांचा मृत्यू

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली माहिती

पाकिस्तानच्या गोळीबारात राजौरीच्या अतिरिक्त जिल्हा आयुक्तांचा मृत्यू

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान पाकिस्तानकडून भारत विरोधी कुरापती सुरूच आहेत. वारंवार पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. यात काही भारतीय नागरिकांनी आपले प्राणही गमावले आहेत. सीमेपलीकडून होणाऱ्या हल्ल्यांना भारतीय लष्कराकडून सडेतोड उत्तर दिलं जात असताना पाककडून करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये जम्मूमध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली आहे. राज कुमार थापा असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, ते अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त म्हणून कार्यरत होते. सीमेवर तणाव वाढल्यानंतर त्यांना नागरिकांच्या मदतीसाठी विशेष जबाबदारी सोपवण्यात आली होती.

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अतिरिक्त आयुक्त राज कुमार थापा यांचा पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती दिली. “एक हादरवून टाकणारी बातमी राजौरीतून आली आहे. आपण जम्मू आणि काश्मीर प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याला गमावले आहे. कालच माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते उपमुख्यमंत्र्यांसोबत हजर होते,” असे अब्दुल्ला यांनी सांगितले. राजौरीमध्ये अधिकाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानावरच पाकिस्तानकडून तोफा डागण्यात आल्या. यात अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राज कुमार थापा यांचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेबद्दल व्यक्त होण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. हे खूप मोठे नुकसान आहे. त्याच्या आत्म्याला शांती मिळो, अशा भावना अब्दुल्ला यांनी व्यक्त केल्या आहेत.

हे ही वाचा : 

उत्तर, पश्चिम भारतातील ३२ विमानतळांवरील नागरी उड्डाणे स्थगित; कधीपर्यंत राहणार बंदी?

जम्मू काश्मीरच्या कर्तव्यावर असलेले घाटकोपरचे मुरली नाईक हुतात्मा

“भारतीय ड्रोन रोखले नाहीत कारण…” पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे अजब स्पष्टीकरण

पाकिस्तानचे अल्लाह के नाम पे दे दे बाबा!

पाकिस्तानने शनिवारी पहाटेच जम्मू काश्मीरच्या राजौरी येथील अतिरिक्त जिल्हा आयुक्त राज कुमार थापा यांच्या घरावर पाकिस्तानने तोफगोळा डागला. या तोफगोळ्याचा स्फोट झाल्याने राज कुमार थापा गंभीर जखमी झाले. त्यांच्यासह दोन कर्मचारीही जखमी झाले. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. परंतु, तिथे राज कुमार थापा यांना मृत घोषित करण्यात आलं.

Exit mobile version