29.2 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरविशेषजम्मू काश्मीरच्या कर्तव्यावर असलेले घाटकोपरचे मुरली नाईक हुतात्मा

जम्मू काश्मीरच्या कर्तव्यावर असलेले घाटकोपरचे मुरली नाईक हुतात्मा

Google News Follow

पंतनगर पोलीस ठाणे, मुंबई हद्दीतील सध्या चित्रा डेअरी जवळ, कामराज नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई या ठिकाणी राहणारे हुतात्मा जवान मुरली श्रीराम नाईक, वय २३ वर्षे हे उरी, जम्मू काश्मीर येथे कर्तव्य करीत असताना ९ मे रोजी पहाटे ३:३० वाजता भारत पाकिस्तान यांच्यातील संघर्ष सुरू असताना हुतात्मा झाले आहेत.

ते २०२२ मध्ये भारतीय सेनादलात नोकरीस लागले होते. त्यांची ट्रेनिंग देवळाली, नाशिक येथे झाली होती, ते पहिल्यांदा आसाम येथे पोस्टिंगला होते, त्यानंतर ते पंजाब येथे तैनातीस असताना त्यांना युद्धा दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये उरी या ठिकाणी कर्तव्य देण्यात आले होते, त्या दरम्यान ते हुतात्मा झाले आहेत.

हे ही वाचा:

त्या नेत्याने S-400 अर्थात सुदर्शन चक्रसाठी केला होता हट्ट!

पाकिस्तानचे अल्लाह के नाम पे दे दे बाबा!

आपल्याकडे पीओके परत घेण्याची क्षमता

‘आकाशतीर’ने कसा घेतला पाकिस्तानी ड्रोन्सचा अचूक वेध

त्यांचे वडील श्रीराम नाईक व त्यांची आई ज्योती नाईक हे पंतनगर पोलीस ठाण्यातील चित्रा डेअरी जवळ, कामराज नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई या ठिकाणी राहावयास आहेत, त्याचे वडील श्रीराम नाईक हे मजुरीचा व्यवसाय करतात.
सध्या ते त्यांच्या मूळ गावी कल्की तांडा, गोरंटाला मंडळा, जिल्हा सत्यसाई नगर, राज्य आंध्र प्रदेश या ठिकाणी यात्रा असल्याने २ मे रोजी गेलेले आहेत.

हुतात्मा जवान मुरली नाईक यांचे पार्थिव अंत्यविधिकारिता त्यांच्या मूळ गावी १० मे रोजी सायंकाळी जाणार आहे असे पंजाब येथील थलसेना कार्यालयातून त्यांना कळविण्यात आले बाबत त्यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा