27 C
Mumbai
Wednesday, February 4, 2026
घरक्राईमनामा... म्हणून ऐश्वर्या- अभिषेक बच्चन यांनी युट्युबकडून ४ कोटींची नुकसानभरपाई मागितली

… म्हणून ऐश्वर्या- अभिषेक बच्चन यांनी युट्युबकडून ४ कोटींची नुकसानभरपाई मागितली

युट्युब आणि त्याची मूळ कंपनी गुगलविरुद्ध नुकसानभरपाईचा दावा

Google News Follow

Related

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी युट्युब आणि त्याची मूळ कंपनी गुगलविरुद्ध नुकसानभरपाईचा दावा केला आहे. तब्बल ४ कोटी रुपये म्हणजेच अंदाजे ४५०,००० डॉलर्स नुकसानभरपाईचा दावा दाखल केला आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या व्यक्तिमत्व हक्कांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या एआय जनरेटेड डीपफेक व्हिडीओ दिसल्यानंतर त्यांनी कायदेशीर पाऊल उचलले आहे.

६ सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या कायदेशीर याचिकेत जोडप्याच्या बौद्धिक संपदा हक्कांचे उल्लंघन करणारे व्हिडिओ काढून टाकण्याची आणि कायमची बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले होते. कंटेंट निर्मितीमध्ये एआयच्या गैरवापराबद्दल वाढत्या चिंतेचा हवाला देत, बच्चन दाम्पत्याने युट्यूबला प्रतिस्पर्धी एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांचे व्हिडिओ वापरण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना लागू करण्याचे निर्देश देण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.

कायदेशीर कागदपत्रांनुसार , खटला हा घृणास्पद आणि लैंगिकदृष्ट्या स्पष्ट एआय-निर्मित सामग्रीला लक्ष्य करण्यासाठी आहे. बच्चन दाम्पत्याचा असा युक्तिवाद आहे की युट्युबने सुरक्षा उपाय सुरू करावेत जेणेकरून त्यांची नावे, आवाज किंवा प्रतिमांचा गैरवापर करणाऱ्या कोणत्याही सामग्रीचा कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे गैरवापर होऊ नये. त्यांचा असा युक्तिवाद आहे की सध्याच्या प्लॅटफॉर्म धोरणांमुळे एआय तंत्रज्ञान विकसित होत असताना आणखी गैरवापर होऊ शकतो. त्यांनी “एआय बॉलीवूड इश्क” या युट्युब चॅनेलचा उल्लेख केला, ज्याच्याकडे २५९ हून अधिक व्हिडिओ आहेत ज्यात बनावट क्लिप्स आहेत आणि त्याला १६.५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एका व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान एका स्विमिंग पूलमध्ये असल्याचे दाखवले आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चन याचेही काही सिन्स आहेत.

हेही वाचा..

संभलमध्ये सरकारी जमिनीवर असलेल्या मशीदीवर बुलडोझर कारवाई

नाशिकमध्ये पावसाने दसऱ्याचा रंग फिका

वन्यजीव सप्ताह : भारताने जगाला काय संदेश दिला ?

तर पाकचा इतिहास, भूगोल बदलून जाईल

या खटल्यात युट्यूबच्या धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, ज्यामुळे निर्मात्यांना एआय प्रशिक्षणासाठी अपलोड केलेल्या सामग्रीचा वापर करण्याची परवानगी दिली जाते. बच्चन कुटुंबाचे म्हणणे आहे की यामुळे लोकांना चुकीच्या पद्धतीने दाखवणारे किंवा गैरवापर करणारे बरेच बनावट व्हिडिओ येऊ शकतात.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा