23 C
Mumbai
Sunday, January 25, 2026
घरक्राईमनामापालिका अधिकारी मारहाण प्रकरणी चौघांना कोठडी, अनिल परबही आरोपी

पालिका अधिकारी मारहाण प्रकरणी चौघांना कोठडी, अनिल परबही आरोपी

११ जुलैपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश

Google News Follow

Related

मनपा अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना वांद्रे न्यायालयाने ११ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.सदा परब, हाजी अलीम, उदय दळवी आणि संतोष कदम असे चौघांची नावे आहेत. शिवसेना नेते (उबाठा) अनिल परब यांचे देखील १ नंबर आरोपी म्हणून प्रथम खबरी अहवालात नाव असून अनिल परब यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली असल्याचे कळते.

मुंबईत वाकोला पोलिसांनी मंगळवारी शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि महाराष्ट्राचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह पाच जणांविरुद्ध वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

शिवसेना शाखा (शाखा कार्यालय) पाडण्याचे नेतृत्व करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दंगल घडवणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी माजी नगरसेवकासह चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असल्या ची माहिती पोलिस उपायुक्त(परिमंडळ ८) दीक्षित गेडाम यांनी दिली होती.

 

सदा परब, हाजी अलीम, उदय दळवी आणि संतोष कदम अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे असून अनिल परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून कुठल्याही क्षणी अनिल परब यांना अटक होऊ शकते, अशी शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तविण्यात आली होती. पण परब यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे.

 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून मारहाणीत आणखी कोण होते का याचा शोध घेण्यात येत आहे. सोमवारी, शिवसेना कार्यकर्त्यांच्या ठाकरे गटाने एच/पूर्व प्रभागाच्या कार्यालयावर शिवसेना नेते अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता.

हे ही वाचा:

पालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अनिल परबांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दिल से बुरा लगता है… फेम देवराज पटेलचे अपघाती निधन; कोण आहे देवराज?

कंपासमधील ब्लेडने दर्शनावर वार नंतर दगडाने मारहाण

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा वॅगनर ग्रुप

 

या दरम्यान एका मनपा अधिकार्‍याला मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी वाकोला पोलिसांनी अनिल परब यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरा वाकोला पोलिसांनी माजी नगरसेवक सदा परब, हाजी अलीम, उदय दळवी आणि संतोष कदम या चौघांना याप्रकरणात अटक केली आहे, अनिल परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून कुठल्याही क्षणी अनिल परब यांना अटक होऊ शकते अशी शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांना आज वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा