उत्तर प्रदेशातील मेरठ येथील टोल प्लाझावर एका जवानावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये टोल कर्मचारी त्या जवानाला काठ्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. रविवारी (१७ ऑगस्ट) रात्री सरूरपूर पोलिस स्टेशन परिसरातील ‘भुनी टोल प्लाझा’ येथे ही घटना घडली. कपिल कवड असे मारहाण झालेल्या जवानाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे आणि पुढील तपास सुरु आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात असलेले जवान कपिल कवड आपल्या गावावरून ड्युटीवर परतण्यासाठी दिल्ली विमानतळावर जात असताना ही घटना घडली. कर्नाल महामार्गावरील टोल प्लाझाजवळ येताच, वाहतूक कोंडी आणि टोल शुल्कावरून टोल कर्मचारी आणि जवनामध्ये वाद झाला आणि थोड्या वेळाने वादाचे रूपांतर शारीरिक हल्ल्यात झाले. व्हिडिओमध्ये टोल कर्मचारी जवानाला लाथा, ठोसे आणि काठ्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. एका क्षणी, एक व्यक्ती वीट उचलताना दिसत आहे.
“संबंधित व्यक्ती, कपिल, सरूरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोटका गावातील रहिवासी आहे आणि भारतीय सैन्यात सेवा देतो,” असे मेरठमधील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी सांगितले की, वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.
हे ही वाचा :
डिंपल यादव म्हणाल्या, ‘माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही’
तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी देण्यासाठी रोजगार मिशन
पाकिस्तानात मुसळधार पावसाचा कहर
तेव्हा काँग्रेसला निवडणूक आयोगाशी हरकत नव्हती
जवान कपिलच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सरूरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिकाऱ्यांनी सहा जणांना अटक केली. पोलिस व्हिडिओमध्ये सहभागी असलेल्या इतरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर जवानाच्या ग्रामस्थांनी टोलवर हल्ला केला, मालमत्तेची तोडफोड केली आणि कर्मचाऱ्यांशी संघर्ष केला. या तोडफोडीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
टोल प्लाजा गुंडो का अड्डा बन गया है। pic.twitter.com/IrEhITTiZb
— sonika choudhary (@sonika82425) August 18, 2025
#MeerutPolice
थानाक्षेत्र सरूरपुर अन्तर्गत भूनी टोल प्लाजा पर टोलकर्मियों द्वारा भारतीय सेना के जवान के साथ की गयी मारपीट की घटना में पुलिस द्वारा त्वरित कार्यवाही करते हुए 04 अभियुक्तों को गिरफ्तार किया गया है। उक्त सम्बन्ध में पुलिस अधीक्षक ग्रामीण द्वारा बाईट। #UPPolice pic.twitter.com/W8XUW1GLue— MEERUT POLICE (@meerutpolice) August 18, 2025







