क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम २० ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे. तुरुंगात गरजेच्या वस्तू विकत घेण्यासाठी आर्यन खानला वडिलांकडून पाठवण्यात आलेली साडे चार हजार रुपयाची मनीऑर्डर गुरुवारी मिळाली असल्याची माहिती आर्थर रोड तुरुंगाचे तुरुंग अधीक्षक यांनी दिली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी आर्यन खान हा व्हिडीओ कॉलिंग द्वारे आई वडिलांशी १० मिनिटे बोलला असल्याची माहिती अधिकारी यांनी दिली आहे.
एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी क्रूझवर टाकलेल्या छाप्या दरम्यान बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्यासह ८ जणांना अटक केली होती. आर्यन खानसह आठही जण तुरुंगात असून त्यांना अद्याप जामीन मिळालेला नसून २० ऑक्टोबर रोजी सत्र न्यायालयात तिघांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत आर्यन खानचा आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम वाढला असून बुधवारी त्याला अलगीकरण सेल मधून सामान्य सेल मध्ये आणण्यात आलेले आहे.
बुधवारी आर्यनला व्हिडीओ कॉलिंग द्वारे आई वडिलांशी बोलून दिले होते. या दरम्यान आर्यनने तुरुंगात काही गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी वडिलांकडे पैशाची मागणी केली होती. गुरुवारी आर्यन खानच्या नावाने आर्थर रोड तुरुंगात मनीऑर्डर प्राप्त झाली असून ही मनीऑर्डर वडिल शहारूख खान यांच्या नावाने आलेली असल्याची माहिती तुरुंग प्रशासनाने दिली आहे. या मनीऑर्डरची रक्कम साडे चार हजार रुपये असून एका वेळी साडेचार हजार रुपयाची मनीऑर्डर पाठवता येते अशी माहिती अधिकारी यांनी दिली आहे.
आर्यनला तुरुंगात शिजवलेले अन्न दिले जात आहे आणि त्याला बाहेरचे कोणतेही अन्न घेण्याची परवानगी नाही, असे हि अधिकारी यांनी सांगितले. “अन्न चांगल्या दर्जाचे आहे आणि आवश्यक मानकांनुसार दिले जाते.”असेही तुरुंग अधिकारी यांनी सांगितले. कारागृहाच्या आवारात कॅन्टीनची सुविधा असून तो आवश्यक वस्तू खरेदी करू शकतो, असे हे अधिकारी म्हणाले. त्याचे वडील शाहरुख खानने त्याला ४५०० रुपयांची मनीऑर्डर पाठवली आहे. आर्यनला एक ओळख क्रमांक देण्यात आला, जो तुरुंगातील अधिकाऱ्यांनी तुरुंगात असताना त्याला दिलेला आहे.
हे ही वाचा:
‘घोटाळेबाज सरकारला घालविण्यासाठी अंदमान निकोबार जेलमध्येही जाईन!
कोलकाता की चेन्नई? कोण करणार विजयी सिमोल्लंघन
भाजपाच्या इशाऱ्यानंतर तामिळनाडू सरकारने मंदिरं उघडली
उद्धव ठाकरे म्हणजे लायसन्स नसलेले ड्रायव्हर, शिवसेनेचाच नेता असे का म्हणाला?
अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले होते की, आर्यन आणि या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या इतर पाच जणांचा अलगीकरणाची कालावधी संपल्यामुळे त्यांच्यासह इतरांना आर्थर रोड कारागृहाच्या सामान्य बॅरेकमध्ये हलवण्यात आले







