पाच बांगलादेशी घुसखोर महिला ७ मुलांसह ताब्यात

एजंटने आणले होते शहरात

पाच बांगलादेशी घुसखोर महिला ७ मुलांसह ताब्यात

घाटकोपर पोलिसांनी ५ बांगलादेशी महिला घुसखोरांना त्यांच्या ७ मुलांसह ताब्यात घेतले आहे, या महिलांच्या झडतीत पोलिसांना आधार कार्ड,भारतीय निवडणूक ओळखपत्र पॅन कार्ड सापडले आहे.

घाटकोपर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून पाचही बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. काजल मलखान खान (२६), फिरोजा इस्लाम नूर मलिक (५०),नूरजहाँ शकुरली मुल्ला (३७),मोहम्मद हसन हलीम मिया(६०) आणि आबीद मोहम्मद हसन शेख (२०)असे अटक करण्यात आलेल्या पाच बांगलादेशी घसखोर महिलांची नावे आहेत.

काजल खान हिच्याकडे ४ मुले असून त्यांचे वय ३ ते ९ वयोगटातील आहे, नूरजहाँ मुल्ला हिच्याकडे ६ वर्षाचे ३ मुले मिळून आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिला मूळच्या तेरोखेडा ठाणे कालिया, जिल्हा नोदाईल , बांगलादेश येथे राहणाऱ्या असून गरिबीला कंटाळून भारतात घुसखोरी करून मागील काही वर्षांपासून नवीमुंबईतील वाशी येथे राहण्यास होत्या.

 

हे ही वाचा:

धर्मांतर करणाऱ्यांसाठी फाशीची तरतूद

चॅम्पियन्स ट्रॉफी : न्यूझीलंडची पाकिस्तानमध्ये धमाल, दुबईत मात्र बेहाल

आयसीसी स्पर्धांमध्ये कोणत्या खेळाडूंचा वाजतोय डंका!

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी महिलांकडे

एजंटच्या मार्फत मुंबईत दाखल …

अटक करण्यात आलेल्या पाचही महिला बांगलादेशातून एजंट मार्फत बेकायदेशीररित्या बांगलादेश भारत सीमा ओलांडून नदी मार्गाने भारतात घुसखोरी करून आल्या,त्यानंतर भारतातील एजंट यांनी त्यांना पश्चिम बंगाल येथे त्यांना बनावट कागदपत्राच्या आधारे आधारकार्ड, पॅन कार्ड आणि भारतीय निवडणूक ओळखपत्र तयार करून पश्चिम बंगाल येथून मुंबईत पाठवले होते. मुंबईतुन नवीमुंबई येथे आपल्या कुटूंब
कबिल्यासह राहत होत्या.

Exit mobile version