29 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरक्राईमनामाभारतातील किशोरवयीन मुलांना शोषणास प्रवृत्त करणाऱ्याला १२ वर्षे तुरुंगवास

भारतातील किशोरवयीन मुलांना शोषणास प्रवृत्त करणाऱ्याला १२ वर्षे तुरुंगवास

ब्रिटनच्या माजी उपमुख्याध्यापकावर झाली कारवाई

Google News Follow

Related

भारतातील दोन किशोरवयीन (१८ आणि १७ वर्षे) मुलांना ६६ हजार पौंड म्हणजे तब्बल ६९ लाख देण्याचे आमिष दाखवून त्यांना लहान मुलांचे लैंगिक शोषण करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी १२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्याने बाल लैंगिक शोषणाच्या दृश्यांच्या बदल्यात गैरवर्तन करणार्‍यांची फी भरणार, असे त्याने सांगितले होते.

लंडनमधील स्मिथ (३५) याने २२ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यात १३ वर्षांखालील मुलावर बलात्कार करण्यास प्रोत्साहन देणे, १३ वर्षांखालील मुलास लैंगिक कृतीत गुंतवणे, तसेच मुलांची असभ्य प्रतिमा बनवणे आणि वितरित करणे आणि एखाद्या व्यक्तीचा ताबा घेणे यांसह कुत्र्याशी संभोग दर्शवणारी प्रतिमा बाळगणे या गुन्ह्यांचा समावेश आहे. अधिकार्‍यांनी स्मिथच्या उपकरणांमधून मुलांच्या एक लाख २० हजारांपेक्षा अधिक अश्लील प्रतिमा जप्त केल्या आहेत. तो टेलिग्रामवरून भारतातील किशोरवयीनांना अल्पवयीन मुलांवर लैंगिक कृत्ये करण्यास सांगत होता, असे चॅट्स आणि रेकॉर्डवरून दिसून आले आहे.

हे ही वाचा:

आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलासह १५जणांविरुद्ध अपहरण, मारहाणीचा गुन्हा दाखल

रजनीकांतचा ‘जेलर’ पाहण्यासाठी जपानी जोडपे पोहोचले चेन्नईला

भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानवर ४-० असा विजय मिळवत गाठली उपांत्य फेरी

केरळचे नाव बदलणार? विधानसभेने एकमताने मंजूर केला ठराव

डिसेंबर २०१६ ते ६ नोव्हेंबर २०२२ रोजी त्याला अटक होईपर्यंतचे हे गुन्हे आहेत. स्मिथने सन २००७ ते २०१४ दरम्यान भारतभरातील अनाथाश्रम आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये काम केले आहे. स्मिथ काठमांडूमध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना त्याने भारतातील किशोरवयीन मुलाला १० वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण करण्यासाठी सात हजार पौंड म्हणजेच सात लाख ४० हजार रुपये दिले होते. त्यानंतर त्याने स्मिथला गुन्ह्याचे छायाचित्र आणि व्हिडिओ पाठवले. स्मिथने भारतातील आणखी एका किशोरवयीन मुलाला सात किंवा आठ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण करण्यासाठी ५९ हजार पौंड म्हणजे तब्बल ६२ लाख रुपये दिले.

स्मिथ भारतात काम करत असताना अल्पवयीन मुलांविरुद्ध संभाव्य गुन्ह्यांचे पुरावे सापडले. राष्ट्रीय गुन्हे यंत्रणेने भारतीय अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. त्याने नेपाळ किंवा ब्रिटनमध्ये राहणाऱ्या मुलांविरुद्ध गुन्हे केल्याचा कोणताही पुरावा नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा