26 C
Mumbai
Thursday, February 19, 2026
घरक्राईमनामाआत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी नेत्याच्या ३ नातेवाईकांची नक्षलवाद्यांकडून हत्या!

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी नेत्याच्या ३ नातेवाईकांची नक्षलवाद्यांकडून हत्या!

१२ हून अधिक गावकऱ्यांना ओलीस ठेवल्याची माहिती

Google News Follow

Related

छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांची क्रूरता उघडकीस आली आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी नेत्याच्या तीन नातेवाईकांची हत्या करण्यात आली आहे. त्याच वेळी ७ जणांना बेदम मारहाण करण्यात आली. याशिवाय नक्षलवाद्यांनी १२ हून अधिक गावकऱ्यांना ओलीस ठेवले असल्याची माहिती आहे. नक्षलवाद्यांच्या या भ्याड कृत्यामुळे गावातील इतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिकांमध्ये भीती पसरवण्यासाठी नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याचे दिसून येते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

एनडीटीव्हीच्या बातमीनुसार, आत्मसमर्पण केलेला नक्षलवादी नेता दिनेश मोडियमच्या नातेवाईकावर नक्षलवाद्यांनी हा अत्याचार केला आहे. हा गुन्हा करणारा नक्षलवादी नेता वेल्ला असल्याचे सांगितले जात आहे. विजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांनी तीन खून झाल्याची पुष्टी केली आहे. पोलिस दल घटनास्थळी रवाना झाले आहेत. या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, माओवादी चळवळ उध्वस्त करण्यात सुरक्षा दलांना लक्षणीय यश मिळत असतानाच, विशेषतः छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशात, जो एकेकाळी डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीवादाचा केंद्रबिंदू होता आणि याच दरम्यान नक्षलवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला.

“माओवादी चळवळ आता शेवटच्या टप्प्यात आहे. त्यांचे नेतृत्व विस्कळीत आणि निराश झाले आहे. दंडकारण्य झोनमध्ये फक्त ३०० सशस्त्र कार्यकर्ते उरले आहेत, ज्यांना आत्मसमर्पण करावे लागेल किंवा निर्णायक युद्धाची तयारी करावी लागेल,” असे बस्तरचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पट्टीलिंगम म्हणाले.

हे ही वाचा : 

पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार!

देशातील पहिला रेडिओ महोत्सव मुंबईत, मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

माजी मंत्री बबनराव घोलप, सुधाकर बडगुजर यांचा शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश!

हा ‘जॅकपॉट’ भारताला कुठच्या कुठे नेईल!

सुंदरराज यांच्या मते, माओवाद्यांबाबत निर्णय घेण्यारी त्यांची सर्वोच्च संस्था म्हणजे त्यांची केंद्रींय समिती ही गेल्या काही वर्षांत बैठका घेत नाहीये. त्यामुळे उर्वरित चार पॉलिटब्युरो सदस्यांना पदभार स्वीकारावा लागला आहे, ज्यापैकी बहुतेक वृद्ध, लपून बसलेले किंवा निष्क्रिय आहेत. माजी डीजीपी आणि नक्षलवादी तज्ज्ञ आरके विज पुढे म्हणाले, “वैचारिक पोकळी स्पष्ट दिसत आहे. माओवादी नेतृत्व क्रांतिकारी वक्तृत्वापासून गुन्हेगारीकडे वळले आहे.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
293,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा