मराठा आरक्षण आंदोलन; मुंबईत आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई पोलिसांचा पुढील तपास सुरू

मराठा आरक्षण आंदोलन; मुंबईत आंदोलकांवर गुन्हे दाखल

आझाद मैदानात झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मुंबईला अक्षरशः वेठीस धरून वाहतूक कोंडी, रास्ता रोको आणि गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांविरोधात अखेर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल नऊ गुन्हे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांत आंदोलकांचा थेट उल्लेख न करता ‘अज्ञात व्यक्ती’ असा उल्लेख करण्यात आला आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत आझाद मैदान, माता रमाबाई आंबेडकर मार्ग, लोकमान्य टिळक मार्ग, कुलाबा, कफ परेड यांसह अनेक पोलीस ठाण्यांत हे गुन्हे दाखल झाले आहेत.

हे ही वाचा:

एक दरवाजा खुला आहे…

CAA मध्ये अंतिम तारीख वाढवली, पाक-बांगलादेशातून येणाऱ्या अल्पसंख्याक हिंदूंना मोठा दिलासा!

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला जामीन

‘राहुल गांधी, तेजस्वी यादव यांच्या सांगण्यावरून आक्षेपार्ह टिप्पणी’

२९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात सुमारे ६० हजार आंदोलक मुंबईत दाखल झाले होते. मोठ्या संख्येने आलेल्या आंदोलकांमुळे सीएसएमटी व फोर्ट परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. हजारो आंदोलकांनी रास्ता रोको केला, रस्त्यावर बेशिस्त वर्तन करत सरकारी मालमत्तेचा वापर केला. तसेच कायदेशीर सूचनांचे उल्लंघन व बेकायदेशीर सभा घेण्यात आल्या.

या प्रकारामुळे पाच दिवस मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले होते. पोलिसांनी आता अज्ञात आंदोलकांविरोधात गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू केल्याचे सांगितले.

Exit mobile version