कांदिवलीत येशूच्या चमत्काराने रोग दूर करणारा कार्यक्रम

आयोजकावर गुन्हा दाखल

कांदिवलीत येशूच्या चमत्काराने रोग दूर करणारा कार्यक्रम

मुंबईतील कांदिवली परिसरात ‘चमत्कारा’च्या नावाखाली अंधश्रद्धेचा प्रसार करणाऱ्या एका कार्यक्रमावर पोलिसांनी कारवाई केली आहे. ख्रिश्चनांच्या या कार्यक्रमात रोग दूर करण्याचे आमिष दाखवून धर्मातरण करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे.

याप्रकरणी चारकोप पोलिसांनी प्रतिक सिताराम नाईक याच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली (पश्चिम) येथील इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील एका बँक्वेट हॉलमध्ये ‘ऑलनाईट प्रेअर’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची जाहिरात प्रतिक नाईक याने ‘इन्स्टाग्राम’च्या माध्यमातून केली होती. या जाहिरातीत ‘आर्थिक सफलता’, ‘कर्जमुक्ती’ आणि ‘कॅन्सर व इतर आजार येशूच्या नावाने बरे होतील’, असे दावे करण्यात आले होते.

हे ही वाचा:

विलेपार्लेत कारची तीन दुचाकींना धडक; महिला मृत्युमुखी

ट्रम्पसमोर मोदींचा नाविक सुरक्षेवर ठाम आवाज

सायबर फसवणूक झालीय? काळजी नको, आता पैसे मिळणार परत !

शेअर बाजारात जोरदार तेजी

ही जाहिरात पाहून तक्रारदार निलेश लालचंद सिंग आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले असता, तिथे ४०० ते ५०० लोक प्रोजेक्टरवर लाईव्ह प्रवचन पाहत असल्याचे त्यांना दिसून आले. तक्रारदाराने हॉलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला असता, आयोजकाने त्यांना अडवून, त्यांच्या देवाच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात अंधश्रद्धा पसरवून अघोरी प्रथांचा प्रसार केला जात असल्याचे लक्षात येताच, तक्रारदारांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आयोजक प्रतिक नाईक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चारकोप पोलीस करत आहेत.

Exit mobile version