30.6 C
Mumbai
Wednesday, June 17, 2026
घरक्राईमनामाविलेपार्लेत कारची तीन दुचाकींना धडक; महिला मृत्युमुखी

विलेपार्लेत कारची तीन दुचाकींना धडक; महिला मृत्युमुखी

दोन जण झाले जखमी

Google News Follow

Related

विलेपार्ले पूर्व येथील स्टेशन रोड परिसरात बुधवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका ४१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. निष्काळजीपणे कार चालवणाऱ्या चालकाने उभ्या असलेल्या दुचाकींना मागून धडक दिल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ४:३० ते ५:०० च्या सुमारास वि. स. खांडेकर रोड परिसरात हा अपघात घडला. आरोपी चालक विलास श्रीधर गव्हाणकर (वय ४४) हा आपली इलेक्ट्रिक कार (क्रमांक एमएच ०१ डीएक्स ९१२५) चालवत होता. या दरम्यान, त्याने गाडीवरचा ताबा गमावला आणि मोगीबाई मार्केट, रेल्वे स्थानक रोड येथे उभे असलेल्या तीन वाहनचालकांना मागून जोरदार धडक दिली.

हे ही वाचा:

ई-रिक्शा आणि ट्रॅक्टरच्या भीषण धडकेत सहा महिलांचा मृत्यू

होर्मुझ खुला, तेलवाहतूक पुन्हा सुरू

ट्रम्पसमोर मोदींचा नाविक सुरक्षेवर ठाम आवाज

या अपघातात किंजल हिरेन शहा (वय ४१) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच, या अपघातात निर्मला डोजिया आणि प्रेमजी डोजिया हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारांसाठी नजीकच्या गावडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित कार चालकावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
315,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा