उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. सायदा (वय २३) या विवाहित महिलेने तिच्या ६७ वर्षीय सासऱ्याचे जाकी (झाकीर) यांचे गुप्तांग नेलकटरच्या ब्लेडने कापल्याचा आरोप आहे. सायदाचा दावा आहे की, गेल्या दोन वर्षांपासून सासरे तिच्यावर सातत्याने बलात्कार आणि लैंगिक अत्याचार करत होते. ही घटना १७ जुलै रोजी बुधाना परिसरातील चांदेरी रोडवरील सफीपूर पट्टी येथे घडली.
सासरा रुग्णालयात दाखल
घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या झाकीर यांना प्रथम सामुदायिक आरोग्य केंद्रात (CHC) नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सायदाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
Daughter-in-law cut the private part of father-in-law with a blade for raping her continuously for the last two years in Muzaffarnagar, UP.
She claims he harassed her whenever her husband was away.
Neighbors alerted police after hearing the man's screams. pic.twitter.com/R2lkrufa3q
— Treeni (@treeni) July 17, 2026
हे ही वाचा:
आता पाकिटात येणार प्लास्टिकच्या नोटा!
पेपरफुटीनंतर आता नीट निकालात देखील मोठा गोंधळ!
अंडी-चिकन महागले; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका!
अभिषेक बॅनर्जींचे पाच मजली कार्यालय करणार उद्ध्वस्त
दोन वर्षांपासून सहन करत होती अत्याचार
सायदाने पोलिसांना सांगितले की, तिचा पती हरियाणामध्ये रिक्षाचालक म्हणून काम करतो आणि बहुतेक वेळा घराबाहेर असतो. ती आपल्या दोन लहान मुलांसह आणि सासऱ्यांसोबत राहत होती. तिच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांपासून सासरे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. याबाबत तिने अनेकदा शेजाऱ्यांना सांगितले होते, मात्र कोणीही तिच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या नाहीत.
शेजाऱ्यांचाही दावा
शेजारी राहणाऱ्या नझरा यांनी सांगितले की, सायदा अनेकदा आपल्यावरील अत्याचाराबाबत बोलायची. मात्र हे कुटुंब फारसे कोणाशी मिसळत नसल्यामुळे घरात नेमके काय घडत होते, याची माहिती बाहेरील लोकांना नव्हती. बुधानाचे पोलिस अधिकारी गजेंद्र पाल सिंह यांनी सांगितले की, पोलिस प्रतिसाद पथकाला (PRV) एका महिलेने सासऱ्यावर ब्लेडने हल्ला केल्याची माहिती मिळाली होती.
पोलिसांनी जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले असून महिलेचा जबाब नोंदवला आहे. त्यांनी सांगितले की, अद्याप दोन्ही पक्षांकडून कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार मिळाल्यानंतर उपलब्ध पुरावे आणि वस्तुस्थितीच्या आधारे संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सध्या पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
