१७ विद्यार्थ्यांशी विनयभंग करणाऱ्या बाबा चैतन्यनंद सरस्वतीला आग्रा येथून अटक!

आरोपानंतर होता फरार 

१७ विद्यार्थ्यांशी विनयभंग करणाऱ्या बाबा चैतन्यनंद सरस्वतीला आग्रा येथून अटक!

लैंगिक छळ आणि फसवणुकीच्या आरोपांना तोंड देत असलेल्या स्वामी चैतन्यनंद सरस्वती यांना अखेर रविवारी (२८ सप्टेंबर) पहाटे ३:३० वाजता आग्रा येथील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. काही दिवसांपासून फरार असलेल्या स्वामी सरस्वती यांच्यावर दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट अँड रिसर्च या संस्थेतील १७ हून अधिक महिला विद्यार्थ्यांनी गंभीर आरोप केले होते.

या महिला आर्थिक दुर्बल घटक (EWS) शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिक्षण घेत होत्या. विद्यार्थिनींनी तक्रारीत नमूद केल्यानुसार, सरस्वती यांनी त्यांच्याशी अपशब्द वापरले, अवांछित (अस्वीकार्य) शारीरिक संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि अश्लील संदेश पाठवले. या आरोपांनंतर स्वामी चैतन्यनंद सरस्वती काही काळ अज्ञातवासात गेले होते. आता त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

या गंभीर आरोपांनंतर, श्री शृंगेरी मठ प्रशासनाने स्वामी चैतन्यनंद सरस्वती, ज्यांना पार्थसारथी म्हणूनही ओळखले जाते, त्यांना संचालक पदावरून काढून टाकले. तसेच ते देशाबाहेर पळून जाऊ नयेत म्हणून पोलिसांनी लूक-आउट नोटीस जारी केली.

हे ही वाचा : 

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा: एनडीआरएफ सज्ज!

कॉमेडियन कपिल शर्माला खंडणीची धमकी; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, आरोपी पश्चिम बंगालमधून जेरबंद

तमिळनाडूत अभिनेता विजयच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ ठार

ऐतिहासिक कामगिरी; पॅरा वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये शीतल देवीला सुवर्ण!

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ६२ वर्षीय स्वयंघोषित धर्मगुरूला एका गुप्त माहितीच्या आधारे आग्रा येथून अटक करण्यात आली. एफआयआरनुसार, त्याने रात्री उशिरा महिला विद्यार्थ्यांना त्याच्या निवासस्थानी येण्यास भाग पाडले आणि त्यांना अयोग्य मेसेज पाठवले. तो त्याच्या फोनद्वारे विद्यार्थ्यांच्या हालचालींवरही लक्ष ठेवत होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपासात आणखी माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Exit mobile version