30.3 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरस्पोर्ट्स१७ सिक्सचा महाप्रलय! आयपीएल इतिहासात ‘सिक्सर किंग’ कोण?

१७ सिक्सचा महाप्रलय! आयपीएल इतिहासात ‘सिक्सर किंग’ कोण?

Google News Follow

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा थरार २८ मार्चपासून सुरू होत आहे. या लीगमध्ये नेहमीच फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळतो, आणि चौकार-षटकारांची आतषबाजी हेच आयपीएलचं खरं आकर्षण ठरतं. चला तर पाहूया, एका डावात सर्वाधिक षटकार ठोकणारे ते ५ धडाकेबाज फलंदाज…

क्रिस गेल:
आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ‘युनिव्हर्स बॉस’ क्रिस गेलच्या नावावर आहे. २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध त्याने ६६ चेंडूत १७५ धावांची ऐतिहासिक खेळी केली. या डावात त्याने तब्बल १७ षटकार आणि १३ चौकार लगावले. ही आयपीएलमधील सर्वात मोठी खेळीही आहे.

ब्रेंडन मॅकलम:
आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना ब्रेंडन मॅकलमने ७३ चेंडूत १५८ धावांची धडाकेबाज खेळी केली. या इनिंगमध्ये त्याने १३ षटकार ठोकत आयपीएलला धमाकेदार सुरुवात करून दिली.

क्रिस गेल (पुन्हा कमाल):
२०१२ मध्ये दिल्लीविरुद्ध ६२ चेंडूत १२८ धावा करताना गेलने १३ षटकार मारले. तसेच २०१५ मध्ये पंजाबविरुद्ध ८४ चेंडूत ११७ धावा करताना त्याने १२ षटकार ठोकले.

एबी डिव्हिलियर्स:
आरसीबीकडून खेळताना एबी डिव्हिलियर्सने २०१६ मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध ७८ चेंडूत १२९ धावा केल्या. या डावात त्याने १२ षटकार ठोकले. विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी २२९ धावांची विक्रमी भागीदारीही केली.

सनत जयसूर्या / मुरली विजय:
२००८ मध्ये चेन्नईविरुद्ध सनत जयसूर्याने ४८ चेंडूत ११४ धावा करत ११ षटकार ठोकले. तसेच २०१० मध्ये मुरली विजयने राजस्थानविरुद्ध १२७ धावांच्या खेळीत ११ षटकार मारले.

आयपीएल म्हणजे फक्त क्रिकेट नाही… तर षटकारांचा उत्सव आहे! आणि या फलंदाजांनी तर त्या उत्सवाला वेगळीच उंची दिली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा