अभिनेत्री दिशा पटानी हिच्या बरेली येथील घरावर १२ सप्टेंबर रोजी गोळीबार झाला होता. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी गोल्डी ब्रार टोळीने घेतली होती. अशातच या प्रकरणातील दोन्ही गुन्हेगारांचा स्पेशल टास्क फोर्सकडून (STF) एन्काऊंटर करण्यात आला. यानंतर दोन पिस्तुल त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांना तुर्की बनावटीचे झिगाना पिस्तूल आणि ऑस्ट्रियन ग्लॉक पिस्तूल सापडले आहेत. पाकिस्तानातून ड्रोन आणि नेपाळमधून मालवाहू मार्गांनी भारतात तस्करी केलेले हेच झिगाना मॉडेल यापूर्वी गँगस्टर अतिक अहमद आणि गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येत वापरले गेले होते.
गोळीबाराची घटना गोल्डी ब्रार टोळीशी संबंधित पाच शूटरनी घडवून आणल्याचे वृत्त आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. गाझियाबादमध्ये गोळीबार करणाऱ्या मृत अरुण आणि रवींद्र यांच्याकडे झिगाना आणि ग्लॉक पिस्तूल सापडल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की झिगाना पिस्तूल सामान्यतः पाकिस्तानातून ड्रोनद्वारे किंवा नेपाळमधून हवाई मालवाहतुकीद्वारे भारतात तस्करी केली जातात. नेपाळमधून मिळवलेल्या पिस्तूलची किंमत सहा लाख रुपयांपर्यंत असल्याने, ड्रोनने पुरवलेल्या झिगानाला जास्त मागणी आहे. झिगाना मॉडेल हा त्याच्या हलक्या वजनामुळे आणि एका वेळी १५ गोळ्या झाडण्याच्या क्षमतेमुळे जास्त वापरला जातो शिवाय हे पिस्तूल सहजासहजी गरम होत नाही.
भारतातील सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र पुरवठादारांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे आणि अलीकडेच केंद्रीय एजन्सींच्या मदतीने अटक करण्यात आलेले सलीम म्हणाला की, मी भारतातील गुंडांना झिगाना पिस्तूल पुरवणारा पहिला होतो, त्यानंतर गुन्हेगारांमध्ये या पिस्तूलची मागणी वाढली. याशिवाय त्याने माहिती दिली की, हे पिस्तूल पाकिस्तानातून ड्रोनने पाठवले जातात किंवा नेपाळ एअर कार्गोद्वारे भारतात तस्करी केले जातात.
हे ही वाचा:
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ईव्हीएम मतपत्रिकांच्या लेआउटमध्ये केले ‘हे’ बदल
पंतप्रधान मोदींचा वाढदिवस: राज्यातील ७५० गावात स्वच्छता अभियान संपन्न!
२६/११ मुंबई, संसद हल्ल्यामागे मसूद अझहरचं; जैशच्या कमांडरची कबुली
सीबीआय न्यायालयाकडून कस्टम निरीक्षकासह दोघांना पाच वर्षांची शिक्षा
दरम्यान, अभिनेत्याच्या निवासस्थानावर हल्ला होण्यापूर्वी आणि नंतर हल्लेखोरांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी २००० हून अधिक सीसीटीव्ही क्लिप्स तपासल्या आहेत. तपासानुसार, गोळीबार करणारे ११ सप्टेंबर रोजी बरेलीला गेले आणि पटानी यांच्या निवासस्थानाबाहेर पाळत ठेवण्यासाठी त्यांनी दोन मोटारसायकली वापरल्या. तर, पाचपैकी एक शूटर आजारपणामुळे माघारी फिरला पण इतर चार जणांनी मिळून त्यांचा कट पूर्ण केला, अशी माहिती आहे.







