25 C
Mumbai
Friday, January 23, 2026
घरक्राईमनामादिल्ली स्फोटप्रकरणी लखनऊमधून डॉ.परवेझला अटक

दिल्ली स्फोटप्रकरणी लखनऊमधून डॉ.परवेझला अटक

डॉ. शाहीनचा भाऊ असल्याचे आले समोर

Google News Follow

Related

दिल्ली स्फोटाचे लखनऊ कनेक्शनही समोर आले आहे. फरीदाबादमधून अटक झालेल्या डॉ. शाहीन शाहिदचे कुटुंब लखनऊच्या लालबाग येथील खंदारी बाजारातील घर क्रमांक १२१ मध्ये राहते. तिचा भाऊ डॉ. परवेझ अन्सारी हा आता एनआयएच्या रडारवर असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

शाहीन शाहिद यांचे नाव समोर आल्यानंतर डॉ. परवेज यांच्यावरही दहशतवादी कटात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मंगळवारी एटीएसने डॉ. परवेजला ताब्यात घेतले. त्याने इंटिग्रल युनिव्हर्सिटीमधून एक आठवडा आधीच राजीनामा दिला होता.

३० ऑक्टोबर रोजी फरीदाबाद येथील अल-फलाह युनिव्हर्सिटीमधून एमबीबीएस विद्यार्थी डॉ. मुज्जमिल अहमदला एसटीएफने अटक केली होती. त्याच्या भाड्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटक, एके-47 रायफल आणि अनेक मॅगझिन्स जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान मुज्जमिलने आपल्या गर्लफ्रेंडचे नाव डॉ. शाहीन शाहिद असल्याचे सांगितले.

शाहीन शाहिदच्या कारमधूनही सापडले होते शस्त्र

यानंतर शाहीन शाहिदच्या कारमधूनही शस्त्रे सापडली. शाहीनला फरीदाबादमधून अटक करण्यात आली. तपासात समोर आले की, शाहीनचा लखनऊशी जुना संबंध आहे. तिचे आजी-आजोबा लालबाग परिसरात राहत होते. शाहीन शाहिदचा विवाह जफर सईद नावाच्या व्यक्तीशी झाला होता. मात्र वर्ष २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. डॉ. जफर सईद हे नेत्ररोग तज्ज्ञ आहेत.

प्रयागराजमधून MBBS; कानपूरमध्ये प्राध्यापक

शाहीन कानपूरच्या गणेश शंकर विद्यार्थी मेडिकल कॉलेजमध्ये (GSVM) कार्यरत होती. २००६ मध्ये ती जीएसव्हीएममध्ये फार्माकोलॉजी विभागात असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू झाली. २०१३ पर्यंत ती येथे प्राध्यापक म्हणून काम करत होती. त्यानंतर २०१३ मध्ये कोणतीही माहिती न देता ती निघून गेली. शाहीनने डॉक्टरकीचे शिक्षण (MBBS)  प्रयागराज येथून केले आहे. जफर सईदसोबत घटस्फोटानंतर ती अटक झालेल्या दहशतवादी डॉ. मुज्जमिल अहमदची गर्लफ्रेंड बनली.

डॉ. परवेज कोण?

शाहीन शाहिदचे नाव समोर आल्यानंतर तिचा भाऊ डॉ. परवेजही संशयाच्या भोवऱ्यात आला. डॉ. परवेज हा मडियांवमधील मुत्तकीपुर येथे राहतो. शाहीनचे वडील म्हणाले की शाहीनला तीन भावंडे आहेत. मोठा मुलगा शोएब, दुसरी शाहीन, आणि तिसरा परवेज.

हे ही वाचा:

फक्त ५५ धावांत कोसळली दक्षिण आफ्रिका!

ईडन गार्डन्सवर इतिहास घडणार!

इस्लामाबादमध्ये न्यायालय परिसरात स्फोट; १२ जणांचा मृत्यू

इस्लामाबादमध्ये न्यायालय परिसरात स्फोट; १२ जणांचा मृत्यू

डॉ. परवेजच्या घरावर छापा

यूपी एटीएस आणि जम्मू–कश्मीर पोलिसांनी मंगळवारी सकाळी सुमारे सात वाजता मडियांवच्या मुत्तकीपुरमधील डॉ. परवेज अन्सारीच्या घरावर छापा टाकला. एटीएसने घरातील सदस्यांची चौकशी केली व महत्त्वाचे कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले. घराबाहेर एक पांढरी अल्टो कार आणि आत स्प्लेंडर मोटारसायकल मिळाली. कारच्या काचेवर इंटिग्रल युनिव्हर्सिटी, गूडंबा यांचे गेट पास आढळले.

6 वर्षांपूर्वी विकत घेतले होते घर

स्थानिकांनी सांगितले की डॉ. परवेज स्वतःला इंटिग्रल युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत असल्याचे सांगत होता. तेथे तो प्रोफेसर होता की डॉक्टर म्हणून काम करत होता, याची चौकशी सुरू आहे. सहा वर्षांपूर्वी त्याने हे घर खरेदी केले होते. त्यांचा विवाह बिहारमध्ये झाला होता, मात्र नंतर पत्नीपासून विभक्त झाले.

डॉ. परवेज सहारनपुर जिल्हा रुग्णालयातही कार्यरत राहिला आहे. त्याने सहारनपुरच्या शोएबकडून UP 11 BD 3563 नंबरची कार खरेदी केली होती. शोएबने सांगितले की २०१७ मध्ये त्याला ही कार लग्नात मिळाली होती. कारवर कर्ज होते व तो हप्ते भरू शकत नव्हता, त्यामुळे आर्थिक गरजेमुळे OLX वर कार विक्रीसाठी टाकली होती. तेव्हा डॉ. परवेजने ती कार खरेदी केली

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा