दिल्लीजवळ फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा सापडल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या लखनौ येथील महिला डॉक्टरवर पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या भारतातील महिला विंगची स्थापना करण्याची जबाबदारी होती, असे दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.
डॉ. शाहीन शाहिदकडे जैश ए मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहर याची बहिण सादिया अझहरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानमध्ये चालणाऱ्या जैशच्या महिला शाखा जमात-उल-मोमिनात च्या भारतातील कार्यभार सोपवण्यात आला होता.
सादिया अझहर यांचे पती युसुफ अझहर हा कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधार होता. त्याचा मृत्यू ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान झाल्याचे समजते.
शाहीन शाहिद कोण आहेत?
माहितीनुसार शाहीन शाहिद ही लखनौच्या लालबाग परिसरात राहते. फरीदाबादमधील जैशचा दहशतवादी मॉड्यूल उघडकीस आल्यानंतर तिला अटक करण्यात आली. तिच्या कारमधून एक असॉल्ट रायफल जप्त करण्यात आली.
शाहीन ही अल-फलाह विद्यापीठाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते आणि तिचा मित्र काश्मिरी डॉक्टर मुज्जमिल गणाई उर्फ मुसैब याच्याशी निकटचा संबंध होता. फरीदाबादमधील दोन भाड्याच्या खोल्यांमधून २९०० किलो स्फोटक आणि ज्वलनशील साहित्य जप्त केल्यानंतर मुसैब याला अटक करण्यात आली.
मूळचा जम्मू-काश्मीरच्या पुलवामाचा असलेला मुज्जमिल हा दिल्लीपासून सुमारे ४५ किमी अंतरावर धौज येथील अल-फलाह विद्यापीठात डॉक्टर होता. श्रीनगरमध्ये जैशच्या समर्थनार्थ पोस्टर्स लावल्याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्याला वॉन्टेड घोषित केले होते. तपासात उघड झाले की असॉल्ट रायफल, पिस्तूल आणि दारूगोळा ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली जी कार होती ती शाहीन शाहिद हिच्या नावावर होती. हरियाणा (HR 51) क्रमांकाची ही मारुती सुजुकी स्विफ्ट कार मुज्जमिलला चौकशीतून माहिती मिळाल्यानंतर जप्त करण्यात आली.
त्याच्या कबुलीजबाबानंतर पोलिसांना मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य (अमोनियम नायट्रेटचा संशय), २० टाइमर आणि इतर संशयास्पद वस्तू मिळाल्या.
हे ही वाचा:
औकिब नबी दारच्या ‘पंजात’ अडकली दिल्ली
इस्लामाबादमध्ये न्यायालय परिसरात स्फोट; १२ जणांचा मृत्यू
षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही!
एलोन मस्क यांनी ग्रोकला ओळखायला दिली गणपतीची मूर्ती; ग्रोकने काय दिले उत्तर?
जमात-उल-मोमिनात बद्दल
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मोठा फटका बसल्यानंतर जैशने आपले अस्तित्व पुन्हा मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदाच महिला विंग जमात-उल-मोमिनात ची स्थापना केली. माहितीनुसार, या नव्या युनिटसाठी भरतीची प्रक्रिया ८ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानातील बहावलपूर येथे मार्कझ उस्मान-ओ-अली या केंद्रात सुरू झाली.
या शाखेचे नेतृत्व मसूद अझहरची बहीण सादीया अझहर करतात, आणि कथितपणे जैश कमांडरांच्या पत्नीसह आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांची भरती बहावलपूर, कराची, मुझफ्फराबाद, कोटली, हरिपूर आणि मनसेरा येथील केंद्रांमधून केले जात आहे.







