पाकिस्तानसे गिरे, खजूर भारत मे अटके…किंमत ३ कोटी

आंतरराष्ट्रीय रॅकेटविरोधात महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी कारवाई

पाकिस्तानसे गिरे, खजूर भारत मे अटके…किंमत ३ कोटी

पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवर भारताने घातलेल्या निर्बंधांना बगल देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटविरोधात महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ३ कोटी रुपये किमतीचे ३६४ मेट्रिक टन सुके खजूर जप्त करण्यात आले. हे खजूर पाकिस्तानातून आणण्यात आले असले, तरी ते संयुक्त अरब अमिरातीतून (UAE) आयात केल्याचे बनावट कागदपत्रांद्वारे दाखविण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयने गुजरातमधील कांडला बंदरावर तपास मोहीम राबवली. यावेळी १३ कंटेनरमधील सुके खजूर ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला हा माल यूएईमधून आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, तपासादरम्यान खजुरांचा मूळ स्रोत पाकिस्तान असल्याचे निष्पन्न झाले. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित माल प्रथम पाकिस्तानातून दुबईला पाठविण्यात आला. तेथे कंटेनर बदलून किंवा पुनर्पॅकिंग करून त्याला यूएईमधून निर्यात झाल्याचे दर्शविण्यात आले. त्यानंतर हा माल भारतात पाठविण्यात आला. अशा प्रकारे पाकिस्तानवरील आयातबंदी टाळण्यासाठी मालाच्या मूळ देशाची माहिती जाणीवपूर्वक लपविण्यात आल्याचा संशय आहे. या प्रकरणी सीमाशुल्क अधिनियम, १९६२ अंतर्गत कारवाई करत संपूर्ण खेप जप्त करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी डीआरआयने तुतिकोरिन बंदरावर आणखी एका कारवाईत सुमारे १.४ कोटी रुपये किमतीची १४ मेट्रिक टन गुग्गुळ राळ जप्त केली होती. ही राळ सोमालियातून आयात केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, तपासात ती पाकिस्तानातून दुबईमार्गे भारतात आणण्यात आल्याचे उघड झाले. गुग्गुळ राळ ही दुर्मिळ आणि संरक्षित वनस्पतीजन्य उत्पादने मानली जातात. तिचा CITES परिशिष्ट-२ मध्ये समावेश असून IUCN रेड लिस्टमध्ये ‘अत्यंत संकटग्रस्त’ प्रजाती म्हणून उल्लेख आहे. या तस्करीप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा धोका, पोस्टमुळे पोलिस सतर्क

मेहबुबा मुफ्तींनी धरला तिरंगा उलटा

ई-२० वादातील गडकरींशी संबंधित डीपफेक, बनावट पोस्ट हटवा

‘मेटा’कुटीला…माफी मागा नाहीतर कारवाई

केंद्र सरकारच्या सुधारित परराष्ट्र व्यापार धोरण-२०२३ अंतर्गत २ एप्रिल २०२५ पासून पाकिस्तानमध्ये उत्पादित किंवा तेथून निर्यात होणाऱ्या कोणत्याही वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर बंदी लागू करण्यात आली आहे. डीआरआयच्या तपासात जप्त करण्यात आलेल्या दोन्ही खेपांमध्ये या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले आहे.

Exit mobile version