27.9 C
Mumbai
Friday, August 7, 2026
घरराजकारणसोनम वांगचुक यांच्या आवाहनानंतर झारखंड आंदोलन संपले

सोनम वांगचुक यांच्या आवाहनानंतर झारखंड आंदोलन संपले

परीक्षेतील अनियमिततेविरोधात सुरू होते आंदोलन

Google News Follow

Related

झारखंडमधील जेपीएससी, जेएसएससी-सीजीएल आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधातील आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. मागील काही दिवसांपासून बेमुदत उपोषणावर असलेले विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आवाहनानंतर बुधवारी पाणी घेतले. मात्र, सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करेपर्यंत अन्न ग्रहण करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

महतो हे ३ जुलैपासून परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधात बेमुदत उपोषण करत आहेत. त्यांच्या प्रकृतीत बिघाड होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोनम वांगचुक यांनी त्यांच्याशी सुमारे १० मिनिटे दूरध्वनीवरून संवाद साधला.

या संवादादरम्यान वांगचुक यांनी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत महतो यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठीचा संघर्ष सुरू ठेवताना किमान पाणी तरी घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. वांगचुक यांच्या विनंतीनंतर महतो यांनी पाणी घेतले. याबाबत त्यांनी सांगितले की, प्रकृती ठीक नसतानाही वांगचुक यांच्या आग्रहामुळे त्यांनी पाणी घेतले आहे. मात्र, पाणी घेतल्याने उपोषण संपलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

“सरकार आमच्या मागण्या पूर्ण करेपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही. मी केवळ पाणी घेतले आहे,” असे महतो यांनी स्पष्ट केले.

वांगचुक यांना रांचीला येण्याचे आवाहन

महतो यांनी सोनम वांगचुक यांना रांची येथे येऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाठिंबा देण्याचे आवाहन केले. वांगचुक यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनाला ज्या प्रकारे पाठिंबा दिला, त्याचप्रमाणे झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाही साथ द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. महतो यांनी वांगचुक यांना सांगितले की, “आपण येथे येऊन आम्हाला भेटल्यानंतरच मी माझे उपोषण सोडेन.”

हे ही वाचा:

रशियाचा भारतावर पुन्हा विश्वास; १० अब्ज डॉलर्सचा व्यवहार रुपयात!

आर्थिक वर्ष २०२६-२७ साठीचा महागाईचा अंदाज ५% वर

मतदारसंघ पुनर्रचना, महिला आरक्षण विधेयकासाठी विशेष सत्र?

टायफॉईड घरात मुलाखती जोरात

सहा विद्यार्थी उपोषणावर

झारखंडमधील परीक्षा गैरप्रकारांच्या मुद्द्यावर सध्या सहा आंदोलक बेमुदत उपोषणावर आहेत. मागील सुमारे दहा दिवसांपासून दोन गटांतील विद्यार्थी आणि नोकरीचे इच्छुक आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये १४व्या झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे रद्दीकरण, जेपीएससी आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगामध्ये व्यापक सुधारणा तसेच कथित परीक्षा गैरप्रकारांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून किंवा राज्याबाहेरील निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या स्वतंत्र समितीकडून चौकशी करण्याची मागणी आहे.

जेपीएससी-जेएसएससी सुधार मंचाचे प्रवक्ते जीवन कुमार यांनी सांगितले की, आंदोलनकर्त्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ तिरंगा मार्च काढण्याबाबतही संघटनेच्या मुख्य समितीची बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपोषणकर्त्या सबिता कुमारी यांनी सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचा दावा केला.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे आश्वासन

दरम्यान, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची सरकार गंभीरपणे दखल घेत असल्याचे म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि प्रश्नांचा बारकाईने विचार करून योग्य वेळी निर्णय जाहीर केला जाईल, असे सोरेन यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांना सरकारच्या निर्णयातून समाधान मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

चौकशीत १४ जणांना अटक

परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांच्या तपासादरम्यान झारखंड पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने आतापर्यंत १४ जणांना अटक केल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आंदोलन आणि आरोपांच्या पार्श्वभूमीवर झारखंड लोकसेवा आयोगाने २५ ते २७ जुलैदरम्यान होणारी संयुक्त नागरी सेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलली होती. अपरिहार्य कारणांमुळे परीक्षा स्थगित करण्यात आल्याचे आयोगाने म्हटले होते.

दिपकेचाही विद्यार्थ्यांना पाठिंबा

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या कॉकरेच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही झारखंडमधील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे. .

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
326,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा